Water without river | नदी नसूनही ‘इथे’ असते मुबलक पाणी!

Water without river
Water without river | नदी नसूनही ‘इथे’ असते मुबलक पाणी!
Published on
Updated on

नद्यांना संस्कृतीची जीवनवाहिनी मानले जाते. परंतु, जगाच्या पाठीवर असे काही देश आहेत, जिथे एकही नैसर्गिक आणि बारमाही नदी अस्तित्वात नाही. भौगोलिक रचना आणि हवामानामुळे या देशांमध्ये नद्यांचे अस्तित्व टिकणे कठीण आहे. तरीही हे देश अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि नैसर्गिक संसाधनांच्या जोरावर आपली पाण्याची गरज पूर्ण करत आहेत. ‘वर्ल्ड अ‍ॅटलास’ने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, वाळवंटी प्रदेश, लहान बेटे आणि अतिशय छोटे आकारमान असलेल्या देशांमध्ये नद्यांचा अभाव दिसून येतो. अनेक देश वाळवंटी भागात असल्याने तिथे पाऊस अत्यंत कमी पडतो आणि पडलेले पाणी कडक उन्हामुळे लगेच बाष्पीभूत होते. काही द्वीपसमूह किंवा ‘सिटी-स्टेटस्’ (उदा. व्हॅटिकन सिटी) इतके लहान आहेत की तिथे नदी प्रणाली विकसित होण्यासाठी पुरेशी जागाच नाही. नद्या नसलेले प्रमुख देश, ठिकाणे आणि त्यांचे पाण्याचे स्त्रोत:

सौदी अरेबिया : येथे पाऊस नगण्य आहे. हा देश समुद्राच्या खार्‍या पाण्याचे गोड्या पाण्यात रूपांतर करणार्‍या ‘डिसॅलिनेशन’ प्रकल्पांवर अवलंबून आहे.

लिबिया : येथे वाळवंटामुळे नद्या नाहीत. परंतु, जमिनीखालील प्रचंड मोठ्या जलसाठ्यांचा वापर करून लाखो लोकांची तहान भागवली जाते.

मध्य आशियाई देश : कुवेत, ओमान, कतार, संयुक्त अरब अमिराती आणि येमेनमध्ये नद्या नाहीत. हे देश प्रामुख्याने भूगर्भातील पाणी आणि समुद्राच्या पाण्यावर प्रक्रिया करून गरज भागवतात.

लहान द्वीपसमूह : बहामास, मालदीव, माल्टा, बहरीन आणि कोमोरोस यांसारख्या बेटांवर नद्यांसाठी पुरेशी जमीन नाही.

जगातील सर्वात लहान देश : व्हॅटिकन सिटी आणि मोनॅको या देशांचा आकार इतका मर्यादित आहे की, तिथे एकही नैसर्गिक नदी वाहू शकत नाही. नद्या नसूनही हे देश केवळ प्रगत तंत्रज्ञान, पावसाच्या पाण्याची साठवण आणि समुद्राच्या पाण्याचे शुद्धीकरण या जोरावर प्रगती करत आहेत, हे विशेष.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news