तब्बल 362 कोटींचा हिरा

अवघ्या पाचच मिनिटांत एका लिलावामध्ये विक्री
Pink diamond sold for world record price
लिलावात 19 कॅरेटचा दुर्मीळ गुलाबी हिरा तब्बल 362 कोटी रुपयांना विकला गेला.Pudhari File Photo
Published on: 
Updated on: 

जीनिव्हा : जगभरात अनेक सुंदर व अनोखे हिरे आहेत. अर्थातच त्यांची किंमत कोट्यवधी रुपयांची असते. गुलाबी रंगाचे हिरे दुर्मीळ असतात व त्यामुळे त्यांना किंमतही मोठीच मिळते. अशाच एका हिर्‍याची अवघ्या पाचच मिनिटांत एका लिलावामध्ये विक्री होऊन त्याला तब्बल 362 कोटी रुपयांची किंमत मिळाली होती!

हा हिरा जगातील सर्वात दुर्मीळ हिर्‍यांपैकी एक आहे. स्वीत्झर्लंडमध्ये 2018 मध्ये झालेल्या लिलावामध्ये 19 कॅरेटचा हा दुर्मीळ गुलाबी हिरा तब्बल 362 कोटी रुपयांना (70 मिलीयन डॉलर) विकला गेला. अमेरिकेचे हिरे व्यावसायिक हॅरी विन्स्टन यांनी जीनिव्हामध्ये झालेल्या एका लिलावात हा हिरा खरेदी केला. ‘पिंक लेगेसी’ नावाचा हा हिरा लिलाव सुरू झाल्यानंतर अवघ्या पाच मिनिटांत विकला गेला होता हे विशेष! अमेरिकेचे हिरे व्यावसायिक हॅरी विन्स्टन यांनी जीनिव्हामध्ये झालेल्या एका लिलावात हा हिरा खरेदी केला. नव्या मालकाने त्याला ‘विन्स्टन पिंक लेगेसी’ असे नाव दिले आहे. हा हिरा पांढर्‍या, चमकदार हिर्‍यांनी मढवलेल्या एका सुंदर अंगठीत जडवलेला आहे. जगात अनेक रंगांचे हिरे पाहायला मिळतात. त्यामध्ये निळ्या, गुलाबी रंगाच्या हिर्‍यांबरोबरच अगदी काळ्या रंगाचाही एक टपोरा हिरा आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news