

नवी दिल्ली : आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या (एआय) इतिहासात एक मोठे आणि क्रांतिकारी पाऊल टाकण्यात आले आहे. आल्टो युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी एक अशी पद्धत विकसित केली आहे, ज्यामुळे एआयचे जटिल टेन्सर ऑपरेशन्स प्रकाशाच्या केवळ एका पासमध्ये पूर्ण होऊ शकतात. या सिंगल-शॉट टेन्सर कंप्युटिंगमुळे एआयची गती आणि ऊर्जा कार्यक्षमता (एनर्जी इफिशन्सी ) अनेक पटीने वाढण्याची शक्यता आहे.
प्रकाशाच्या वेगाने एआयचे कामटेन्सर ऑपरेशन्स म्हणजे काय?
टेन्सर ऑपरेशन्स ही आधुनिक तंत्रज्ञानाचा आधारभूत प्रगत गणितीय क्रिया आहे, ज्यांची तुलना एका रुबिक्स क्यूबला एकाच वेळी अनेक आयामांमधून (मल्टिपल डायमेशन्स) फिरवण्याशी करता येईल. इमेज प्रोसेसिंग, भाषा आकलन (लॅग्वेज अंटरस्टॅडिंग) आणि डीप लर्निंग यांसारख्या कार्यांसाठी टेन्सर ऑपरेशन्स आवश्यक असतात. सध्याच्या सारख्या पारंपरिक डिजिटल हार्डवेअरला ही कामे क्रमाने (स्टेप बाय स्टेप) करावी लागतात, ज्यामुळे वेग कमी होतो आणि ऊर्जा वापर वाढतो. प्रकाशात हे सर्व ऑपरेशन्स एकाच वेळी आणि नैसर्गिकरीत्या (सायमटेनियस्ली आणि नॅचरली) करण्याची क्षमता आहे.
एका पासमध्ये गणना अर्थात सिंगल-शॉट कंप्युटिंग
डॉ. युफेंग झांग यांच्या नेतृत्वाखालील पथकाने प्रकाशाच्या एकाच हालचालीत (सिंगल मुव्हमेंट) जटिल टेन्सर गणिते पूर्ण करण्याची पद्धत दाखवली आहे. या पद्धतीत, डिजिटल माहिती प्रकाशाच्या लहरींच्या आयाम आणि फेजमध्ये (अॅप्लिट्युड अँड फेज) एन्कोड केली जाते. प्रकाश लहरी एकमेकांशी क्रिया करताना, मॅट्रिक्स आणि टेन्सर गुणाकार यांसारखी आवश्यक गणितीय प्रक्रिया आपोआप (अॅटोमॅटिकली) पूर्ण करतात. निष्क्रिय प्रक्रिया : या प्रक्रियेत सक्रिय नियंत्रण (अॅक्टीव्ह कंट्रोल) किंवा इलेक्ट्रॉनिक स्विचिंगची गरज नसते, ज्यामुळे ऊर्जेचा वापर अत्यंत कमी होतो. भविष्यातील लाईट-बेस्ड हार्डवेअर आल्टो युनिव्हर्सिटीच्या संशोधकांचा उद्देश हा आहे की, भविष्यात हे कॉम्प्युटेशनल फ्रेमवर्क थेट फोटोनिक चिप्सवर समाकलित केले जावे. प्रोफेसर झिपेई सन यांच्या मते, या एकत्रीकरणामुळे प्रकाश एआय आधारित प्रोसेसर अत्यंत कमी उर्जेच्या वापरात जटिल कार्ये करू शकतील. डॉ. झांग यांचा अंदाज आहे की, ही पद्धत पुढील 3 ते 5 वर्षांत मोठ्या तंत्रज्ञान कंपन्यांच्या विद्यमान हार्डवेअरमध्ये समाविष्ट केली जाऊ शकते, ज्यामुळे एआयच्या कार्यांमध्ये लक्षणीय गती मिळेल.