phone security important things to check carefully
सुरक्षेसाठी फोनमधील ‘या’ गोष्टींकडे गांभीर्याने पाहा...Pudhari File Photo

Phone Security | सुरक्षेसाठी फोनमधील ‘या’ गोष्टींकडे गांभीर्याने पाहा...

Published on

नवी दिल्ली : सायबर क्राईमची रोज नवनवीन प्रकरणे समोर येत आहेत. त्यामुळे आपला स्मार्टफोन सुरक्षित आहे की नाही, हे तपासणे गरजेचे ठरत असते. हॅकर्स कधी फोटो पाठवून, कधी कॉल करून तर कधी लिंक पाठवून लोकांना फसवत असतात. केवळ चुकीच्या लिंकवर क्लिक केल्यास तुमचा फोन हॅक होईल आणि प्रत्येक पर्सनल डिटेल्स आता हॅकर्सच्या हातात असेल. अशावेळी तुमचा पर्सनल डेटा लीक करण्यापासून ते बँक खाते रिकामे करण्यापर्यंत काहीही एका झटक्यात करता येऊ शकते. याशिवाय हॅकर्स हळूहळू वैयक्तिक डेटा चोरत असतात. अशा पार्श्वभूमीवर फोनमधील सुरक्षेबाबत तज्ज्ञांनी दिलेली ही माहिती...

अचानक तुमचा फोन आपोआप चालू आणि बंद होऊ लागला, तर समजून घ्या की कोणीतरी तुमच्या फोनमध्ये रिमोट अ‍ॅक्सेस करण्याचा प्रयत्न करत आहे आणि त्यावर नियंत्रण ठेवत आहे. अशावेळी तुमचा फोन हॅक झाला आहे, हे समजून घ्यायला हवं. तुमच्या फोनची बॅटरी अपेक्षेपेक्षा जास्त वेगाने संपत आहे, असे तुम्हाला कधी वाटत असेल तर. म्हणजे तुम्ही तुमचा स्मार्टफोन नेहमीइतकाच वापरत आहात; पण आता बॅटरी लवकरच संपायला लागली आहे, त्यामुळे हे फोनमधील कोणत्याही बिघाडामुळे नाही, तर हॅकिंगमुळे झाले असेल. फोनमध्ये कोणतातरी व्हायरस आला, तर तो बॅकग्राऊंडमध्ये डेटा शेअर करत राहतो, अशा अ‍ॅक्टिव्हिटी सतत सुरू असताना बॅटरी लवकर संपू लागते. तुम्हाला आणखी अनोळखी कॉल आणि मेसेज यायला लागले असतील, तर हे देखील फोन हॅकिंगचे लक्षण असू शकते.

अनोळखी कॉल किंवा मेसेजमध्ये अचानक वाढ होणे सामान्य नाही, म्हणून त्याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका. अशावेळी समजून घ्या की, एकतर तुमचा फोन हॅक झाला आहे किंवा तुमचा नंबर वापरून मेसेज पाठवले जात आहेत. तुम्हाला आता अशी कोणतीही चिन्हे दिसत असतील किंवा तुमचा फोनही हॅक झाला आहे, असे तुम्हाला वाटत असेल, तर ताबडतोब त्यावर उपाययोजना करा. अशावेळी तुम्हाला तुमच्या फोनच्या सेटिंगमध्ये जावे लागेल. आता फॅक्टरी डेटा रिसेट करा. नेहमी लक्षात ठेवा की, तुम्हाला काही डाऊनलोड करायचे असेल, तर ते अधिकृत अ‍ॅप स्टोअरमधून करा. याशिवाय कोणत्याही अनोळखी लिंकवर क्लिक करू नका किंवा तुमचा ‘ओटीपी’ कोणालाही शेअर करू नका.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news