

बीजिंग ः रेशमाचा शोध सर्वप्रथमच चीनमध्येच लागला आणि ‘सिल्क रोड’ (रेशीम मार्ग) या नावाने प्रसिद्ध असलेल्या मार्गाने रेशमाच्या कापड व वस्तूंचा व्यापार अन्य देशांशी सुरू झाला. या मार्गाने केवळ व्यापारच साधला असे नाही तर इतरही अनेक गोष्टींची देवाणघेवाण घडली. याच मार्गाने चीनमध्ये पहिल्यांदा पाळीव मांजरी सुमारे 1,400 वर्षांपूर्वी पोहोचल्या होत्या, असे प्राचीन मांजरांच्या डीएनए अभ्यासातून समोर आले आहे. हा नवीन अभ्यास पूर्वीच्या संशोधनांपेक्षा शेकडो वर्षांनी उशिराचा कालावधी दर्शवतो. विशेष म्हणजे, त्या काळातील चिनी उच्चवर्गीयांना या मांजरींचे विशेष आकर्षण वाटत होते.
‘मांजरींना सुरुवातीला मौल्यवान आणि विदेशी पाळीव प्राणी मानले जात होते,’ असे या अभ्यासाच्या सहलेखिका आणि बीजिंग विद्यापीठाच्या प्रयोगशाळा ऑफ जीनोमिक डायव्हर्सिटी अँड इव्होल्यूशनमधील प्रमुख संशोधक शु-जिन लुओ यांनी सांगितले. ‘त्यांचे गूढ वर्तन कधी प्रेमळ, कधी अघोरी यामुळे त्यांना एक वेगळे वलय प्राप्त झाले.’ आधुनिक पाळीव मांजरी ( ऋशश्रळी लर्रीीीं) या आफ्रिकन वन्य मांजरींपासून (ऋशश्रळी ीळर्श्रींशीीींळी श्रूलळलर) उत्पन्न झाल्या आहेत. संशोधनानुसार, सुमारे 10,000 वर्षांपूर्वी या मांजरी मध्य पूर्वेत मानवांसोबत राहू लागल्या, त्यानंतर 3,000 वर्षांपूर्वी युरोपात पसरल्या. इ.स. 600 च्या सुमारास, व्यापारी आणि मुत्सद्दी पूर्व भूमध्यसागर आणि मध्य आशियातून मांजरी चीनमध्ये घेऊन आले. त्या काळात फक्त काही निवडक मांजरीच चीनमध्ये आणल्या गेल्या होत्या आणि त्या उच्चवर्गीयांसाठी ‘भेटवस्तू’ म्हणून दिल्या जात होत्या.
तथापि, चीनमध्ये याआधीही माणसांनी काही प्रकारच्या मांजरींसोबत सह-अस्तित्व ठेवले होते. पुरातत्वशास्त्रीय पुराव्यांनुसार, 5,400 वर्षांपूर्वी उत्तर-पश्चिम शान्शी प्रांतातील प्राचीन शेती गावांमध्ये स्थानिक बिबट्या मांजरी ( झीळेपरळर्र्श्रीीीी लशपसरश्रशपीळी) आढळल्या होत्या. मात्र, हे मांजरी आणि मानव यांच्यातील केवळ सह-अस्तित्व होते, ते खरे ‘पाळणे’ (डोमेस्टिकेशन) नव्हते. संशोधकांच्या मते, हॅन राजवंशाच्या काळात (इ.स.पू. 206 ते इ.स. 220) चीनमध्ये मांजरींचे पाळीव प्राणी म्हणून अस्तित्व होते, या समजाला कोणतेही ठोस पुरावे नाहीत. या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी, शु-जिन लुओ आणि त्यांच्या टीमने चीनमधील 14 पुरातत्त्वीय स्थळांवरील 22 मांजरींच्या हाडांचे विश्लेषण केले. या नमुन्यांचा कालावधी 5,000 वर्षांचा आहे. संशोधकांनी मांजरींच्या हाडांमधून न्यूक्लियर आणि माइटोकॉन्ड्रियल डीएनएचे अनुक्रमण (सीक्वेन्सिंग) केले आणि या निष्कर्षांची जगभरातील 108 माइटोकॉन्ड्रियल आणि 63 न्यूक्लियर जीनोम्सच्या आधीच्या डेटाशी तुलना केली. ‘चीनमध्ये मानवांच्या जवळ राहणार्या लहान मांजरींवर करण्यात आलेला हा सर्वात मोठा आणि सखोल अभ्यास आहे,’ असे लुओ यांनी नमूद केले. या अभ्यासातून हे स्पष्ट झाले आहे की, चीनमध्ये पाळीव मांजरी साधारणतः 1,400 वर्षांपूर्वीच आल्या आणि त्यांचा प्रसार उच्चभ्रू समाजाच्या आकर्षणातून झाला.