नासाच्या ‘पर्सिव्हरन्स’ रोव्हरला मंगळावर सापडले अनोखे खडक

Perseverance rover Mars
नासाच्या ‘पर्सिव्हरन्स’ रोव्हरला मंगळावर सापडले अनोखे खडक
Published on
Updated on

वॉशिंग्टन ः नासाचा ‘पर्सिव्हरन्स’ रोव्हर सध्या मंगळावरील जिझेरो खंदकाच्या कडेकपारीत प्राचीन जीवसृष्टीच्या खुणा शोधत आहे. मंगळाच्या विषुववृत्ताच्या उत्तरेला असलेला हा कोरडा आणि वाटीच्या आकाराचा खंदक, अब्जावधी वर्षांपूर्वी एका मोठ्या तलावाने भरलेला होता, असा शास्त्रज्ञांचा अंदाज आहे.

डिसेंबर 2024 पासून, पर्सिव्हरन्स ‘विच हॅझल हिल’ नावाच्या एका उंच उतारावरून उतरत आहे. येथे संशोधकांना मंगळाच्या प्राचीन हवामानाचे संकेत मिळण्याची आशा आहे. 11 एप्रिल रोजी, रोव्हरने एका ठिकाणी थांबून निरीक्षण केले, जिथे उजळ आणि गडद रंगाचे खडक एकत्र येतात. या ठिकाणी ‘स्कल हिल’ नावाचा एक खास खडक संशोधकांचे लक्ष वेधून गेला. त्याचा गडद रंग, कोनीय रचना आणि खाचयुक्त पृष्ठभाग यामुळे तो परिसरातील इतर खडकांपेक्षा वेगळा दिसत होता. हा भाग ‘पोर्ट अ‍ॅन्सन’ म्हणून ओळखला जातो आणि येथे अशा अनेक खडकांचा आढळ झाला आहे, जे कदाचित इतर ठिकाणातून इथे आले असावेत. यांना ‘फ्लोटस्’ असे म्हणतात. शास्त्रज्ञांच्या मते, अब्जावधी वर्षांपूर्वी मंगळावर गरम व आर्द्र हवामान होते, नद्या, सरोवरे आणि शक्यतो महासागरही होते. त्यावेळी हे खडक वाहून इथे आले असावेत. नंतर पाण्याचा अंश उडून गेल्यावर आणि आजूबाजूचे मऊ साहित्य झिजल्यानंतर हे टिकाऊ खडक मंगळाच्या पृष्ठभागावर शिल्लक राहिले. ‘पोर्ट अ‍ॅन्सनमध्ये आम्हाला काही गडद रंगाचे ‘फ्लोटस्’ आढळले आहेत,’ असे नासाच्या ब्लॉगपोस्टमध्ये नमूद करण्यात आले. ‘हे खडक नेमके कुठून आले आणि कसे इथे पोहोचले याचा शोध घेतला जात आहे. ‘स्कल हिल’ वरील खाचांचे कारण दोन प्रकारचे असू शकते : कदाचित खडकातील लहान तुकडे ढिले पडून झिजले असावेत, किंवा मंगळावरील वार्‍यांनी त्याच्या पृष्ठभागावर वाळूच्या कणांसारखे रगड घालून हे खड्डे तयार केले असावेत. हा खडक उल्का असण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती, मात्र ‘सुपरकॅम’ने घेतलेल्या रासायनिक चाचण्यांनुसार तो सामान्य उल्कापिंडासारखा नाही. याउलट, या खडकांचा उगम ज्वालामुखीय असण्याची शक्यता आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news