crocodile meat consumption | चक्क मगर खाणारे लोक

crocodile meat consumption |
crocodile meat consumption | चक्क मगर खाणारे लोक
Published on
Updated on

नैरोबी : जगातील काही आदिवासी जमाती या अत्यंत धोकादायक मानल्या जातात. काही तर मानवालाच खातात, तर काही भलत्याच प्राण्यांना खातात. त्यांचे राहणीमान आणि खाण्यापिण्याच्या पद्धती विचित्र मानल्या जातात. एका आदिवासी जमातीत मगरीची आणि पाणघोड्याची शिकार हे शौर्याचे प्रतीक मानले जाते, तर त्यांना पाहताच जंगलाचा राजा सिंहासारखे हिंस्त्र प्राणी सुद्धा धूम ठोकतात. कोणती आहे ही आदिवासी जमात?

एल मोलो आदिवासी जमातीमध्ये मगरींची शिकार केली जाते. इतकेच नाही तर पाणघोडेही त्यांना पाहताच दूर पळतात अथवा पाण्यात लपतात. केनिया या देशात ही आदिवासी जमात आहे. आता ही लोक बोटावर मोजण्याइतके आहेत. या लोकांची संख्या अगदी 300 ते 400 इतकीच उरली आहे. या शिकार्‍यांना पाहताच सिंहसुद्धा दुसरा मार्ग निवडतात. कारण यांच्या मनात आले तर हे प्राणी सुद्धा त्यांची शिकार होऊ शकतात. एल मोलो ही जमात मूळात शिकारीत निष्णात आहे. हे आदिवासी लोक धरण, तलाव, नदीच्या काठी छोट्या झोपड्यांमध्ये राहतात. या समाजाचा शौर्याची परिभाषा वेगळी आहे.

मगर आणि पाणघोडा यांची शिकार करण्यात जो तरबेज असेल तो या जमातीमधील सर्वात हुशार आणि निष्णात शिकारी मानला जातो. विशेष म्हणजे मगर आणि पाणघोड्याला मारण्यासाठी ते काही मोठ्या हत्याराचा, शस्त्राचा वापर करत नाहीत. हार्पून म्हणजे अणकुचीदार गारगोटीचा वापर करून एक भाला तयार करतात. अगोदर शिकारीला टप्प्यात येऊ देतात आणि मग तिची या हार्पूनने शिकार करतात. दोन ते तीन भाल्यात ते तिची शिकार करतात. त्यानंतर मगर पाण्याबाहेर काढत, ती शिजवून गाव पंगत दिली जाते. मगर अधिक असणार्‍या पाणथळ जागी त्यांच्या झोपड्या असतात.

कित्येक शतकापासून ही जमात मासे, मगर, पाणघोडे आणि इतर प्राण्यांवर उदरनिर्वाह करतात. केनिया सरकारने मगर आणि पाणघोड्यांच्या शिकारीवर कडक निर्बंध आणल्यापासून आता या जमातीची संख्या झपाट्याने घटली आहे. ही जमात आता शहरात स्थलांतरीत होत आहे. आता उरलेले एल मोलो लोक हे माशांवर ताव मारते. या जमातीचे अजून एक वैशिष्ट्ये म्हणजे ही आदिवासी जमात अधिक काळ जगत नाही. 30 ते 45 वर्ष हे त्यांचे सरासरी वय आहे. त्यामुळे या जमातीची संख्या घटली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news