Crying for Money | रडण्यासाठीही दिले जातात पैसे!

Crying for Money |
Crying for Money | रडण्यासाठीही दिले जातात पैसे!
Published on: 
Updated on: 

बीजिंग : जगात अशी काही ठिकाणं आहेत, जिथे दुसऱ्यांच्या अंत्यसंस्काराला जाऊन रडण्यासाठीही लोकांना पैसे दिले जातात, होय तुम्ही अगदी बरोबर वाचलं, या लोकांना ‘प्रोफेशनल मॉनर्स’ म्हणजे व्यावसायिक रडणारे म्हटलं जातं. आता प्रश्न पडला असेल की, दुसऱ्याच्या घरात मृत्यू झाला म्हणून कुणी पैसे घेऊन रडायला कसं काय जाऊ शकतं? पण ही गोष्ट खरी आहे. जगातील काही देशांमध्ये ही अनेक वर्षांपासून चालत आलेली परंपरा आहे. काही ठिकाणी तर अंत्यसंस्कारात मोठ्याने रडणं, दुःख व्यक्त करणं आणि मृत व्यक्तीच्या आठवणी सांगणं यालाही विशेष महत्त्व दिलं जातं.

या कामात सहभागी होणाऱ्या व्यक्तींना अंत्यसंस्कारासाठी बोलावलं जातं. तिथे जाऊन त्या मृत व्यक्तीसाठी रडतात, शोकगीत गातात आणि त्यांच्या आठवणी सांगतात. काही जण तर मृत व्यक्तीच्या आयुष्यावर आधारित शोकसंगीतही सादर करतात. चीनच्या काही भागांमध्ये व्यावसायिक रडणाऱ्यांची परंपरा आजही पाहायला मिळते. तिथे त्यांना ‘कुसांगरेन’ असं म्हटलं जातं. अंत्यसंस्काराच्या वेळी हे लोक मोठमोठ्याने रडतात, शोकगीत गातात आणि मृत व्यक्तीच्या आयुष्यावर बोलतात. काही ठिकाणी मोठा रडण्याचा सोहळादेखील आयोजित केला जातो. काही वेळा घरातील व्यक्तीच्या मृत्यूनंतर कुटुंबीय दुखामुळे सुन्न होतात. काहींना आपलं दु:ख व्यक्त करणंही कठीण जातं. अशा वेळी व्यावसायिक रडणाऱ्यांना बोलावलं जातं. त्यांच्या रडण्यामुळे आणि शोकसंगीतामुळे अंत्यसंस्कारात सहभागी झालेल्या इतरांनाही आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी आधार मिळतो.

आफ्रिकेतील केनियाच्या पश्चिम भागातही व्यावसायिक रडणाऱ्यांची परंपरा आहे. विशेषत:, लुओ समुदायाच्या अंत्यसंस्कारांमध्ये अशा व्यक्तींना बोलावलं जातं. या लोकांचं काम फक्त रडण्यापूरतं मर्यादित नसतं, तर सामूहिक शोक प्रदर्शन करणदेखील असतं. या नोकरीचं मानधन प्रत्येक ठिकाणी वेगळं असतं. ते अंत्यसंस्काराचा प्रकार, कामाचा कालावधी आणि संबंधित व्यक्तीच्या अनुभवावर अवलंबून असतं. केनियामधील अशा प्रत्येक व्यावसायिक रडणाऱ्याला ८० अमेरिकन डॉलर म्हणजेच भारतीय चलनानुसार ७,५९३ रुपये मिळतात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.