Ancient parrot feather trade | एक हजार वर्षांपूर्वी पेरूमध्ये पोपटांच्या पिसांचा होता मोठा व्यापार

नव्या संशोधनातील माहिती
Ancient parrot feather trade |
Ancient parrot feather trade | एक हजार वर्षांपूर्वी पेरूमध्ये पोपटांच्या पिसांचा होता मोठा व्यापार
Published on
Updated on

लिमा : सुमारे 1,000 वर्षांपूर्वी, ‘इन्का’ साम्राज्यापूर्वीच्या संस्कृतीने अ‍ॅमेझॉनच्या वर्षावनांमधून शेकडो मैल लांबून रानटी पोपट आणले होते. हे पोपट सध्याच्या पेरूच्या किनारपट्टीवर बंदीवासात ठेवले जात असत, जेणेकरून त्यांच्या रंगीबेरंगी पिसांचा वापर प्रतिष्ठेचे प्रतीक म्हणून करता येईल. एका नवीन संशोधनातून ही रंजक माहिती समोर आली आहे.

सुमारे 20 वर्षांपूर्वी संशोधकांना एका 1,000 वर्षे जुन्या थडग्यात काही पिसे सापडली होती. आता या पिसांच्या नवीन विश्लेषणामुळे त्यांचा संपूर्ण प्रवास उलगडला आहे. हे पक्षी नेमके कुठून आले, त्यांनी काय खाल्ले आणि कोणत्या मार्गाने त्यांना ‘इश्मा’ संस्कृतीपर्यंत पोहोचवले गेले, याचा उलगडा झाला आहे. ‘इश्मा’ ही इन्का पूर्व काळातील एक प्रगत संस्कृती होती, जी इसवी सन 1000 ते 1470 या काळात भरभराटीस आली होती. इन्का आणि इतर संस्कृतींमध्ये पोपटाच्या पिसांना महत्त्व होते हे आधीच माहीत होते. परंतु, हे नवीन संशोधन सिद्ध करते की, ‘इश्मा’ संस्कृतीने इन्का साम्राज्याच्या खूप आधी अँडीज पर्वतरांगांच्या पलीकडे एक अत्यंत प्रगत व्यापारी जाळे निर्माण केले होते.

2005 मध्ये लिमाच्या दक्षिणेला 20 मैलांवर असलेल्या ‘पाचाकामाक’ मंदिराच्या उत्खननात दोन मोठी थडगी सापडली होती. त्यापैकी एका थडग्यात पुरातत्त्वशास्त्रज्ञांना शतकानुशतके जतन केलेली पोपटाची अत्यंत गडद आणि स्पष्ट रंगांची पिसे सापडली. आंतरराष्ट्रीय संशोधकांच्या गटाने या पिसांचे डीएनए आणि रासायनिक परीक्षण केले. त्यातून असे दिसून आले की, ही पिसे अ‍ॅमेझॉनमधील जिवंत पोपटांची होती, ज्यांना डोंगरदर्‍यांतून प्रवास करून पेरूच्या किनारपट्टीवर आणले गेले आणि तिथे त्यांना पाळले गेले.

हे संशोधन मंगळवारी (10 मार्च) ‘नेचर कम्युनिकेशन्स’ या प्रसिद्ध नियतकालिकात प्रसिद्ध झाले आहे. या प्रकल्पाचे सह-संचालक आणि मानववंशशास्त्राचे प्राध्यापक इझुमी शिमाडा यांनी सांगितले की, ‘आमचा अभ्यास हे सिद्ध करतो की, इन्का साम्राज्याच्या कित्येक शतके आधी ‘इश्मा’ आणि ‘चिमू’सारख्या संस्कृतींनी अत्यंत संघटित आणि लांब पल्ल्याचे व्यापारी मार्ग प्रस्थापित केले होते. त्यांच्याकडे सखोल पर्यावरणीय ज्ञान होते आणि अमेझॉनला किनारपट्टीवरील वाळवंटाशी जोडणारे व्यापारी करार त्यांनी केले होते.’

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news