Paris Heatwave | पॅरिसवासीय उष्णतेने हैराण!

Paris Heatwave |
Paris Heatwave | पॅरिसवासीय उष्णतेने हैराण!
Published on
Updated on

पॅरिस : भारतातील अनेक शहरांमध्ये सध्या तापमान ४४ अंश सेल्सिअस किंवा त्याहून अधिक नोंदवले जात असतानाच, युरोपमधील अनेक देशही सध्या भीषण उष्णतेचा सामना करत आहेत. कडक ऊन आणि उष्णतेच्या लाटेमुळे फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये हाहाकार माजला आहे. या पार्श्वभूमीवर, वीकेंडला (शनिवार-रविवार) होणारी प्रतिष्ठित 'डायमंड लीग ट्रॅक अँड फील्ड स्पर्धा' रद्द करण्यात यावी, अशी मागणी येथील पोलिस प्रशासनाने केली आहे. देशातील आपत्कालीन सेवांवर प्रचंड ताण आल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.

पोलिस प्रवक्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पॅरिसमध्ये २१ जूनपासून सुरू असलेला उष्णतेचा कहर आणि अभूतपूर्व तापमान पाहता, रविवारी होणारी ही स्पर्धा आणि इतर कार्यक्रम (ज्यामध्ये म्युझिक फेस्टिव्हल आणि प्राईड मार्चचा समावेश आहे) रद्द करण्याची विनंती करण्यात आली आहे. फ्रान्सच्या हवामान खात्याने ('मेट्रो फ्रान्स') दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी देशातील ३० हवामान केंद्रांवर सरासरी तापमान पुन्हा ३० अंश सेल्सिअसवर पोहोचले होते, जे आदल्या दिवशी नोंदवल्या गेलेल्या राष्ट्रीय विक्रमाच्या बरोबरीचे आहे. फ्रान्सच्या इतिहासात पहिल्यांदाच देशातील पाऊण भागापेक्षा जास्त (तीन चतुर्थांश) भागामध्ये 'रेड वेदर अलर्ट' जारी करण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news