Paris Hilton pink jet | हे विमान आहे की, चालता-फिरता गुलाबी महाल?

पतीकडून पॅरिस हिल्टनला वाढदिवसाची खास भेट
paris-hilton-gets-pink-private-jet-from-husband-carter-reum
हे विमान आहे की, चालता-फिरता गुलाबी महाल?Pudhari File Photo
Published on
Updated on

लॉस एंजेलिस : प्रत्येक जोडीदाराची इच्छा असते की, त्यांच्या पार्टनरने त्यांना अशी भेट द्यावी, जी आयुष्यभरासाठी अविस्मरणीय ठरेल. याच गोष्टीला प्रत्यक्षात उतरवत प्रसिद्ध अमेरिकन मॉडेल आणि अभिनेत्री पॅरिस हिल्टनच्या पतीने, कार्टर रियमने, तिला एक अशी शानदार आणि अमूल्य भेट दिली आहे, जी ती आयुष्यभर विसरू शकणार नाही. या भेटीने सध्या जगभरात चर्चांना उधाण आले आहे. ही भेट आहे पूर्णपणे गुलाबी रंगाची थीम असलेले एक सुंदर विमान!

पॅरिस हिल्टन ही एक अमेरिकन सोशलाईट, मीडिया पर्सनॅलिटी, मॉडेल, गायिका आणि हॉलीवूड अभिनेत्री आहे. तिने अमेरिकेतील अनेक रिअ‍ॅलिटी शो आणि टीव्ही मालिकांमध्ये काम केले आहे. विशेषतः, ‘द सिंपल लाईफ’ या शोमधील तिच्या भूमिकेमुळे ती जगभरात ओळखली जाते. तिच्या आलिशान जीवनशैलीमुळे ती नेहमीच चर्चेत असते. पॅरिस हिल्टनला तिच्या वाढदिवसानिमित्त पती कार्टर रियमकडून एक खास भेट मिळाली आहे. ही भेट म्हणजे दुसरे-तिसरे काही नसून एक ‘गल्फस्ट्रीम G450’ (Gulfstream G450) प्रायव्हेट जेट आहे. या विमानाला केवळ खरेदीच केले नाही, तर पॅरिसच्या आवडीनिवडी आणि तिच्या जीवनशैलीनुसार पूर्णपणे बदलण्यात आले आहे.

हे विमान आता एखाद्या चालत्या-फिरत्या गुलाबी महालासारखे दिसते. या विमानाच्या आतील आणि बाहेरील भागात पॅरिसच्या आवडीचा ‘गुलाबी’ रंग प्रामुख्याने वापरण्यात आला आहे. यातील बदल पाहून कोणीही आश्चर्यचकित होईल. विमानाच्या आतमध्ये गुलाबी रंगाचे गालीचे, हाताने बनवलेल्या खास लेदर सीटस् आणि तब्बल 7 वेगवेगळ्या प्रकारच्या गुलाबी लाईटस् लावण्यात आल्या आहेत. विमानात एक फ्रिज आणि शॅम्पेनसाठी खास प्रकारचे ग्लासदेखील बनवण्यात आले आहेत, जेणेकरून प्रवासातही लक्झरीचा अनुभव घेता येईल.

या प्रायव्हेट जेटला बाहेरूनही खास गुलाबी रंगाने रंगवण्यात आले आहे, ज्याला ‘पॅरिस पिंक’ असे नाव देण्यात आले आहे. हे विमान केवळ दिसायलाच सुंदर नाही, तर ते तांत्रिकद़ृष्ट्याही अत्यंत शक्तिशाली आहे. G450 विमानाचा वेग .74 मॅक आहे आणि ते एकदा इंधन भरल्यावर न थांबता 4,350 नॉटिकल मैल (जवळपास 8,000 कि.मी.) पर्यंत उड्डाण करू शकते. हे विमान लॉस एंजेलिस ते न्यूयॉर्क किंवा मियामी ते लंडन असा प्रवास एकाच उड्डाणात पूर्ण करू शकते. विमानाचे केबिन 45 फूट लांब असून, छताची उंची 6 फूट 2 इंच आहे, ज्यामुळे आतमध्ये अत्यंत आरामदायक आणि प्रशस्त वाटते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news