Household Chores Robot | ‘ओपन एआय’ बनवणार घरकामे करणारा रोबो

२०२७ पर्यंत प्रात्यक्षिक दाखवण्याची शक्यता
Household Chores Robot |
Household Chores Robot | ‘ओपन एआय’ बनवणार घरकामे करणारा रोबो
Published on: 
Updated on: 

वॉशिंग्टन : कल्पना करा, तुमच्या घरात असा एक रोबो आहे जो तुमचे ऐकतो, वस्तू उचलून योग्य ठिकाणी ठेवतो, घरातील लहान-मोठी कामे करतो आणि गरज पडल्यास ऑफिसच्या कामातही मदत करतो... ‘ChatGPT’ तयार करणारी प्रसिद्ध टेक कंपनी OpenAI सध्या याच दिशेने वेगाने काम करत आहे. कंपनीचे सीईओ सॅम ऑल्टमन यांनी एका पॉडकास्ट दरम्यान माहिती दिली की, ‘ओपन एआय’ माणसासारखा दिसणारा आणि काम करणारा रोबो तयार करत आहे. याचे पहिले प्रात्यक्षिक (डेमो) पुढील काही वर्षांत समोर येऊ शकते. या रोबोचा डेमो २०२७ मध्ये येऊ शकतो.

पॉडकास्टमध्ये बोलताना ऑल्टमन म्हणाले की, आपली ही जगातील रचना माणसांच्या सोयीनुसार करण्यात आली आहे. घरातील दरवाजे, पायऱ्या, संगणक, स्वयंपाकघर आणि रोजच्या वापरातील साधने ही मानवी शरीराचा विचार करून तयार केली गेली आहेत. अशा परिस्थितीत जर एखाद्या रोबोला आपल्यात राहून काम करायचे असेल, तर त्याचे शरीरही माणसासारखेच असणे गरजेचे आहे. म्हणजेच त्याला दोन हात, दोन पाय आणि वस्तू घट्ट पकडण्याची क्षमता असावी लागेल. ऑल्टमन यांच्या मते, या प्रकल्पातील सर्वात मोठे आव्हान रोबोचे शरीर बनवणे हे नसून, त्याला असा बुद्धिमत्ता असलेला ‘मेंदू’ देणे हे आहे, ज्याद्वारे तो स्वतः समजून घेऊ शकेल की कधी आणि काय करायचे आहे. उदाहरणार्थ, जर तुम्ही रोबोला पाण्याचा ग्लास आणायला सांगितला, तर त्याला ग्लास ओळखणे, तो योग्य प्रकारे पकडणे आणि पाणी न सांडता तुमच्यापर्यंत आणणे हे जमले पाहिजे.

यासाठी केवळ हात-पाय असणे पुरेसे नाही, तर रोबोटला त्याच्या आसपासच्या वातावरणाची जाणीव असावी लागेल आणि चूक झाल्यास ती स्वतःहून सुधारावी लागेल. सॅम आल्टमन यांनी ‘फॉर्च्यून’ला दिलेल्या माहितीनुसार, कंपनी २०२७ मध्ये आपल्या या रोबोचे प्रात्यक्षिक दाखवू शकते. मात्र, सामान्य लोकांपर्यंत असे रोबो पोहोचण्यासाठी आणखी काही वर्षांचा कालावधी लागेल. सध्या कंपनीने याची किंमत, डिझाईन किंवा अधिकृत लाँचची तारीख जाहीर केलेली नाही. OpenAI ची योजना सुरुवातीला असे रोबो बनवण्याची आहे, जे कुशल कामगारांसोबत उत्पादन आणि इतर महत्त्वाच्या कामांमध्ये मदत करू शकतील. पुढे जाऊन कंपनी असे वैयक्तिक (पर्सनल) रोबो बनवू इच्छिते, जे घरांमधील विविध कामे हाताळू शकतील. या रोबोच्या निर्मितीसाठी कंपनी अभियंते आणि इतर तज्ज्ञांची भरती करत आहे. तथापि, घरात कॅमेरे आणि मायक्रोफोन असलेले रोबोट आल्यास लोकांची गुप्तता (प्रायव्हसी) आणि सुरक्षेशी संबंधित प्रश्नही उपस्थित होण्याची शक्यता आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news