OpenAI Prism launch | ‘ओपन एआय’ कडून वैज्ञानिकांसाठी ‘प्रिझम’ लाँच

OpenAI Prism launch |
OpenAI Prism launch | ‘ओपन एआय’ कडून वैज्ञानिकांसाठी ‘प्रिझम’ लाँच
Published on
Updated on

सॅन फ्रान्सिस्को : आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) आता केवळ चॅटिंग किंवा कोडिंगपुरते मर्यादित राहिलेले नाही. संशोधनाच्या जगातही ‘एआय’ वेगाने पाय रोवत आहे. याच पार्श्वभूमीवर, ‘ओपन एआय’ ने ‘प्रिझम’ नावाचे एक नवीन वैज्ञानिक वर्कस्पेस लाँच केले आहे. विशेष म्हणजे, ज्यांच्याकडे चॅटजीपीटी खाते आहे, असे सर्व युजर्स याचा मोफत वापर करू शकतील.

‘प्रिझम’कडे तुम्ही एक ‘स्मार्ट वर्ड प्रोसेसर’ म्हणून पाहू शकता. हा केवळ टाईपिंगमध्ये मदत करत नाही, तर स्वतः एका संशोधकाप्रमाणे विचार करण्याची क्षमता ठेवतो. हा टूल ‘ओपन एआय’ च्या सर्वात आधुनिक GPT-5.2 मॉडेलवर आधारित आहे. उपयोग ः स्वतःच्या दाव्यांची पडताळणी करता येईल. संशोधनाची भाषा अधिक प्रगल्भ आणि अचूक करता येईल. जुने संशोधन आणि संदर्भ काही सेकंदात शोधता येतील. हे टूल स्वतः संशोधन करणार नाही, तर शास्त्रज्ञांच्या कामाचा वेग वाढवण्यास मदत करेल.

‘ओपन एआय’ च्या माहितीनुसार, त्यांच्या कंज्यूमर उत्पादनांवर (उदा. चॅटजीपीटी) विज्ञानाशी संबंधित कठीण प्रश्नांचे प्रमाण झपाट्याने वाढले आहे. दर आठवड्याला सरासरी 84 लाख मेसेज प्रगत वैज्ञानिक विषयांवर येतात. जरी यातील किती प्रश्न व्यावसायिक शास्त्रज्ञांचे आहेत हे स्पष्ट नसले, तरी शैक्षणिक जगात ‘एआय’चा वापर वाढत असल्याचे हे लक्षण आहे. गणित आणि सांख्यिकी क्षेत्रातही याचे सकारात्मक परिणाम दिसत आहेत. अलीकडेच GPT-5.2 Pro च्या मदतीने सांख्यिकी सिद्धांताचे नवीन पुरावे तयार करण्यात आले आहेत, ज्याची मानवी संशोधकांनीही पुष्टी केली आहे.

‘प्रिझम’ ची खास वैशिष्ट्ये :

1. LaTeX सपोर्ट : वैज्ञानिक दस्तऐवज लिहिण्यासाठी वापरल्या जाणार्‍या ‘LaTeX’ प्रणालीशी हे टूल जोडलेले आहे. यामुळे गणितातील अत्यंत कठीण सूत्रे (Formulas) लिहिणे सोपे होते.

2. डायग्राममध्ये रूपांतर : संशोधक अनेकदा बोर्डवर चित्रे काढून संकल्पना स्पष्ट करतात. ‘प्रिझम’ आपल्या व्हिज्युअल क्षमतेचा वापर करून या हाताने काढलेल्या चित्रांचे प्रोफेशनल डिजिटल डायग्राममध्ये रूपांतर करू शकतो.

3. प्रोजेक्टचे संपूर्ण आकलन : जेव्हा तुम्ही ‘प्रिझम’ मध्ये चॅट विंडो उघडता, तेव्हा या ‘एआय’ ला तुमच्या संपूर्ण प्रोजेक्टची माहिती असते. त्यामुळे तो दिलेली उत्तरे तुमच्या कामाशी संबंधित आणि अत्यंत अचूक असतात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news