जगात फक्त 33 घड्याळे; किंमत प्रत्येकी 1 कोटी पार!

जगात फक्त 33 घड्याळे; किंमत प्रत्येकी 1 कोटी पार!
File Photo
Published on
Updated on

बर्न : असे अनेक लोक असतात, ज्यांना महागड्या गोष्टींची आवड असते. त्यामुळे कोणत्याही गोष्टीचे युनिक आणि महागड्या पिसला लोक आपल्याकडे सांभाळून ठेवतात. घड्याळदेखील त्यापैकीच एक आहे. दोन प्रसिद्ध कंपन्यांनी मिळून जगात फक्त 33 घड्याळ तयार केले, ज्याची किंमत साहजिकच कोट्यवधींमध्ये आहे. घड्याळे ही केवळ वेळ दाखवण्यासाठी नसतात, तर ती स्टेटस् सिम्बॉल्स देखील असतात, जे लक्झरी दर्शवतात. विशेषतः, मोठे ब्रँडस् लोकांना विलक्षण गोष्टी बनवून देत असतात.

आघाडीच्या दोन घड्याळ कंपन्या एकत्र आल्या तर मात्र काहीतरी हटके येणार, हे तर निश्चित आहे. त्यांनी नुकतंच एक असे घड्याळ लॉन्च केलं आहे, जे केवळ 33 जणांसाठी उपलब्ध असेल! याचाच अर्थ अशाप्रकारचे फक्त आणि फक्त 33 घड्याळे बाजारात उपलब्ध असतील, जे काही ठरावीक लोकांकडे पाहायला मिळतील. अशा प्रकारच्या गोष्टींना लिमिटेड ऍडिशन असे म्हणतात.

हे घड्याळ म्हणजे सौंदर्य आणि उत्कृष्ट कारागिरीचे एक उत्तम उदाहरण आहे. या घड्याळाच्या रचनेत एक वेगळाच ट्विस्ट आहे. हे घड्याळ अशापद्धतीने डिझाईन केलं गेलं आहे की, एकदा पाहिल्यानंतर ते नजरेसमोरुन हटणार नाही. या घड्याळाच्या मालिकेचा इतिहास 1940 च्या दशकात सुरू झाला. या घड्याळांची प्रेरणा रोमन संस्कृतीतल्या सर्पांच्या डिझाईन्समधून घेतली गेली आहे. एमबी अँड एफने यामध्ये आधुनिक तंत्रज्ञान आणि अनोख्या घटकांची भर घातली आहे.

ही घड्याळे फक्त 33 लोकांसाठीच बनवण्यात आली आहेत. त्यामुळे ते खूपच दुर्मीळ आणि महाग आहेत. एका मीडिया रिपोर्टनुसार या एका घड्याळाची किंमत 1.28 कोटी असेल, तर याच्या रोज गोल्ड एडिशनची किंमत 1.47 कोटी असेल. यामध्ये अत्याधुनिक मेकॅनिझम, हाताने बनवलेले डायल आणि हिर्‍यांनी जडवलेली बॉडी आहे. ज्या लोकांना लक्झरी आणि युनिक घड्याळ हवं असेल, अशा लोकांसाठी हे घड्याळ आहे. त्यामुळे त्याची किंमत जास्त आहे, असं या घड्याळाची निर्मिती करणार्‍या कंपनीने म्हटले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news