Oldest Rocks Discovery | सर्वात जुन्या खडकांमध्ये ‘आदि-पृथ्वी’चे अवशेष!

Oldest Rocks Discovery
Oldest Rocks Discovery | सर्वात जुन्या खडकांमध्ये ‘आदि-पृथ्वी’चे अवशेष!janiecbros
Published on
Updated on

टोरांटो : आज आपण ज्या रूपात पृथ्वीला पाहतो, त्या रूपात येण्यापूर्वी ती लाव्हा आणि खडकांचा एक तप्त गोळा होती. शास्त्रज्ञांना प्रथमच याच अति-प्राचीन ‘आदि-पृथ्वीचे’ (प्रोटो अर्थ) अवशेष आपल्या ग्रहावरील सर्वात खोल आणि जुन्या खडकांमध्ये लपलेले आढळले आहेत. जवळपास 4.5 अब्ज वर्षांपूर्वीचे हे पुरावे टिकून राहिले आहेत, हा एक अविश्वसनीय शोध आहे. या आंतरराष्ट्रीय संशोधन पथकाने या शोधाची तुलना वाळूच्या बादलीतून एकच दाणा उचलण्याशी केली आहे.

हे अवशेष कितीही लहान आणि प्राचीन असले, तरी ते आता पृथ्वी अगदी नवीन ग्रह असताना येथे असलेल्या पर्यावरणीय परिस्थितीचा अभ्यास करण्यासाठी वापरले जाऊ शकतात. हा शोध आपल्यासारखे ग्रह कसे अस्तित्वात आले असावेत, हे उघड करण्यासही मदत करू शकतो. मॅसॅच्युसेटस् इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथील भू-रसायनशास्त्रज्ञ निकोल नी म्हणतात, ‘आदि-पृथ्वी’चे मूळ साहित्य आम्ही जतन केले आहे, याचा हा कदाचित पहिला थेट पुरावा आहे. आम्हाला अत्यंत प्राचीन पृथ्वीचा एक तुकडा सापडला आहे, जो एका प्रचंड टक्कर होण्यापूर्वीचा आहे.

हे आश्चर्यकारक आहे, कारण पृथ्वीच्या उत्क्रांतीदरम्यान ही अति-प्राचीन खूण हळूहळू नष्ट होईल अशी आमची अपेक्षा होती.’ ही ‘आदि-पृथ्वी’ फक्त थोड्या काळासाठी, म्हणजे अंदाजे 100 दशलक्ष वर्षे अस्तित्वात होती. त्यावेळी, ‘थिया’ नावाच्या मंगळाच्या आकाराच्या उल्केच्या पृथ्वीला झालेल्या प्रचंड धडकेने आपल्या ग्रहाची रासायनिक रचना बदलली आणि चंद्राची निर्मिती झाली. निकोल नी आणि त्यांच्या सहकार्‍यांनी पोटॅशियम-40 आइसोटोपमधील कमतरता शोधली. पूर्वीच्या एका अभ्यासात, या घटकातील भिन्नता पृथ्वीवर सापडलेल्या खडकांची उत्पत्ती निश्चित करण्यासाठी योग्य असल्याचे सिद्ध झाले होते.

नी म्हणतात, ‘त्या कामात, आम्हाला आढळले की वेगवेगळ्या उल्कांमध्ये पोटॅशियमचे आईसोटोपिक हस्ताक्षर वेगवेगळे आहे. याचा अर्थ पोटॅशियमचा वापर पृथ्वीच्या निर्मितीच्या घटकांचा मागोवा घेण्यासाठी केला जाऊ शकतो.’ ग्रीनलँड, कॅनडा आणि हवाई येथील प्राचीन खडकांच्या नमुन्यांचे सखोल विश्लेषण करून, जेथे ज्वालामुखीमुळे पृथ्वीच्या गाभ्यातून साहित्य वर येते. संशोधकांना एक अनोखे ‘पोटॅशियम सिग्नेचर’ आढळले जे यापूर्वी कधीही पाहिले गेले नव्हते. याच जणु काही पोटॅशियमच्या स्वाक्षरीमुळे आदि-पृथ्वीच्या अस्तित्वाचा पुरावा मिळाला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news