Ancient Drug Use | व्यसनाचा सर्वात जुना पुरावा इंडोनेशियात सापडला!

Ancient Drug Use |
Ancient Drug Use | व्यसनाचा सर्वात जुना पुरावा इंडोनेशियात सापडला!
Published on
Updated on

जकार्ता : जगातील मानवी इतिहासातील व्यसनाचा सर्वात जुना पुरावा इंडोनेशियातील एका बेटावर सापडला आहे. हिमयुगातील शिकारी लोक दातदुखीपासून आराम मिळवण्यासाठी सुपारीचे सेवन करत असल्याचे एका नवीन अभ्यासात समोर आले आहे. सुपारीमध्ये चेतासंस्थेवर प्रभाव पाडणारे घटक असतात.

‘सायन्स ॲडव्हान्सेस’ या नियतकालिकात प्रसिद्ध झालेल्या अभ्यासानुसार, संशोधकांनी दोन प्रागैतिहासिक मानवांच्या दातांवरील विचित्र खोबण्यांचा अभ्यास करून हा शोध लावला. दातांमधील या खोल खोबण्या नियमितपणे सुपारी खाल्ल्यामुळे निर्माण झाल्या होत्या. इंडोनेशियातील ‘सुलवेसी’ बेटावर या दोन व्यक्तींचे आंशिक सांगाडे आढळून आले. विशेष म्हणजे या दोन व्यक्ती हजारो वर्षांच्या फरकाने जगल्या होत्या : पहिली व्यक्ती : ४० ते ५० वयोगटात मृत्यू झालेला एक पुरुष, जो २५,००० ते १६,००० वर्षांपूर्वी जगला होता. हा काळ शेवटच्या हिमयुगाचा सर्वात तीव्र काळ मानला जातो.

दुसरी व्यक्ती : सुमारे ७,६०० ते ६,३०० वर्षांपूर्वी सुलवेसी बेटावर जगलेली व्यक्ती (या व्यक्तीचे लिंग निश्चित होऊ शकलेले नाही). सुपारीमध्ये ‘आरिकोलिन’ नावाचे न्यूरोॲक्टिव्ह संयुग असते. सध्याच्या काळात चुना लावून सुपारी चघळल्याने उत्तेजना मिळते. परंतु, त्या काळात थेट सुपारी चघळल्याने तोंडाचा भाग बधीर होत असे. संशोधनानुसार, या दोन्ही व्यक्तींच्या दातांचे इतके प्रचंड नुकसान झाले होते की, दातदुखीच्या वेदना कमी करण्यासाठी त्या आयुष्यभर सतत सुपारी चघळत असाव्यात. परंतु, दीर्घकाळात या उपायाचा उलटाच परिणाम झाला. सुपारी सतत चघळल्यामुळे त्यांच्या दातांतील खड्डे आणि छिद्रे अधिक गंभीर होऊन त्यांच्या वेदना आणखी वाढल्या असण्याची शक्यता संशोधकांनी वर्तवली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news