Vatsala Elephant Death | सर्वात वृद्ध हत्तीण कालवश

Vatsala Elephant Death
Vatsala Elephant Death | सर्वात वृद्ध हत्तीण कालवशPudhari File Photo
Published on
Updated on

भोपाळ : जगातील सर्वात वयस्कर हत्तीण म्हणून ओळखल्या जाणार्‍या ‘वत्सला’ने मंगळवारी दुपारी अखेरचा श्वास घेतला. मध्य प्रदेशातील पन्ना व्याघ्र प्रकल्पात तिने आपले जीवन व्यतीत केले. वयोमानानुसार तिला अनेक आरोग्य समस्यांनी ग्रासले होते. अंदाजे 100 ते 110 वर्षे वय असलेल्या वत्सलाने गेल्या 32 वर्षांपासून पन्ना व्याघ्र प्रकल्पाला आपले घर बनवले होते.

दोन वेळा हत्तींच्या हल्ल्यातून वाचलेल्या वत्सलाची मोतीबिंदूमुळे द़ृष्टी पूर्णपणे गेली होती. तसेच तिला पचनसंस्थेचे आणि चालण्या-फिरण्याचे आजारही होते. त्यामुळे तिला विशेष आहारात केवळ लापशी दिली जात असे. सोमवारी पायाच्या नखाला झालेल्या दुखापतीमुळे ती अशक्त झाली होती. वनविभागाच्या कर्मचार्‍यांनी आणि पशुवैद्यकांनी तिला उभे करण्याचे प्रयत्न केले; पण ते अयशस्वी ठरले आणि मंगळवारी दुपारी तिचे निधन झाले.

वत्सलाला 1972 मध्ये केरळच्या निलंबूर जंगलातून मध्य प्रदेशात आणण्यात आले होते. तिच्या वयाचा कोणताही अधिकृत पुरावा नसला, तरी सुमारे 40 वर्षांपूर्वीच तिचे दात पडले होते, जे साधारणपणे हत्तीच्या 60-70 व्या वर्षी पडतात. यावरूनच ती शंभर वर्षांहून अधिक वयाची असल्याचा अंदाज तज्ज्ञ व्यक्त करत होते. वत्सलाच्या निधनाने वन्यजीवप्रेमींमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news