Okra price USA | अमेरिकेत भेंडी सात हजार रुपये किलो!

Okra price USA | अमेरिकेत भेंडी सात हजार रुपये किलो!
Published on
Updated on

वॉशिंग्टन : भारतीय मध्यमवर्गीय घरातील ताटांमध्ये रुळलेल्या भाज्या म्हणजे वांगी, दोडका, कोबी, फ्लॉवर आणि भेंडी. भारतीय बाजारात भेंडी फार-फार तर ४० ते ५० रुपये किलोने मिळतात. मात्र, सध्या सोशल मीडियावर हीच भेंडी जोरदार चर्चेत आहे. कारण, आपली हीच साधी भेंडी सातासमुद्रापार अमेरिकेत चक्क ७,२५० रुपये किलो दराने विकली जात असल्याचे समोर आले आहे. अर्थात, ही कच्ची भेंडी नसून ती कुरकुरीत तळलेली व मसाला लावलेली भेंडी आहे!

इन्स्टाग्राम इन्फ्लुएन्सर आशिष आहुजाने याबद्दलची एक पोस्ट शेअर केली आहे. यामुळे सर्वजण चकित झाले आहेत. आपण बाजारात गेलो की भेंडी कोवळी आहे की नाही हे पाहण्यासाठी तिचे टोक मोडून बघतो. पण, अमेरिकेतील एका सुपरमार्केटमध्ये भेंडीचे अगदी छान स्टाईलमध्ये दिली जाते. आशिष आहुजाने जेव्हा या सुपरमार्केटला भेट दिली, तेव्हा त्याला कच्ची भेंडी कुठे दिसलीच नाही. त्याऐवजी तिथे एका पाकिटांमध्ये बंद असलेली, मस्त मसाल्यात घोळवलेली आणि कुरकुरीत तळलेली भेंडी विकली जात होती. जेव्हा आशिषने त्याची किंमत पाहिली, तेव्हा त्याला झटकाच बसला.

अवघ्या ८५ ग्रॅमच्या भेंडीच्या चिमुकल्या पाकिटाची किंमत ६.५ डॉलर्स इतकी होती. याचाच अर्थ आपल्या चलनात सुमारे ६०० रुपये. जर या हिशेबाने हिशेब केला, तर १ किलो भेंडीसाठी अमेरिकतील लोकांना तब्बल ७,२५० रुपये मोजावे लागत आहेत. इन्स्टाग्राम इन्फ्लुएन्सर आशिष आहुजा याने नुकताच सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओतून परदेशी बाजारपेठेत भारतीय भाज्यांचे कशा प्रकारे ब्रँडिंग केले जात आहे आणि त्यांची किंमत किती पटीने वाढवली जाते, याकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे.

दरम्यान, त्याच सुपरमार्केटमध्ये आंतरराष्ट्रीय ब्रँडचे चिप्सचे पाकीट २.५० डॉलर्सला मिळत असताना, भेंडीचे पाकीट मात्र त्याच्या दुप्पट म्हणजेच ६.५ डॉलर्सला विकले जात होते. अमेरिकेत भेंडीला केवळ भाजी न मानता एक ‘हेल्दी स्नॅक’ म्हणून प्रमोट केले जात आहे. ही भेंडी खास पद्धतीने तळून आणि परदेशी ग्राहकांच्या आवडीचे मसाले लावून तयार केली जाते, ज्यामुळे ती दीर्घकाळ टिकते. आरोग्याबाबत जागरूक असलेल्या अमेरिकन ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी या उत्पादनाला ‘प्रीमियम’ दर्जा देण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news