Painless injection technology | आता इंजेक्शन टोचताना वेदना होणार नाहीत!

चीनने बनवले शरीरातील नस-नस दाखवणारे मशिन
Painless injection technology |
Painless injection technology | आता इंजेक्शन टोचताना वेदना होणार नाहीत!
Published on
Updated on

बीजिंग : वैद्यकीय क्षेत्रात चीनने पुन्हा एकदा आपल्या प्रगत तंत्रज्ञानाचा डंका वाजवला आहे. चिनी शास्त्रज्ञांनी अशा एका उपकरणाची निर्मिती केली आहे, जे मानवी त्वचेच्या खाली लपलेल्या नसा (व्हेन्स) अगदी स्पष्टपणे पाहण्यास मदत करते. यामुळे आता डॉक्टर आणि नर्स यांचे काम सोपे होणार असून, रुग्णांना इंजेक्शन किंवा सलाईन लावताना होणारा त्रास कमी होणार आहे.

चीनच्या एका आघाडीच्या मेडिकल कंपनीने हे रिअल टाईम व्हॅस्क्युलर इमेजिंग डिव्हाईस विकसित केले आहे. हे उपकरण इन्फ्रारेड किरणांचा वापर करून हातावर किंवा शरीराच्या कोणत्याही भागावर प्रकाश टाकते. त्वचेखालील नसा या किरणांना शोषून घेतात आणि काही सेकंदांतच नसांचा एक रंगीत नकाशा त्वचेवर डिजिटल पद्धतीने दिसू लागतो. यामुळे नसांची जाडी आणि त्यांचे अचूक स्थान स्पष्टपणे समजते. या तंत्रज्ञानाचे मोठे फायदे होणार आहे.

अनेकदा लहान मुले, वृद्ध किंवा गंभीर रुग्णांच्या नसा सहज सापडत नाहीत. अशावेळी वारंवार सुया टोचल्या जातात. या मशिनमुळे पहिल्याच प्रयत्नात अचूक ठिकाणी इंजेक्शन टोचणे शक्य होईल. त्यामुळे वेदनांपासून मुक्ती मिळणार आहे. चुकीच्या ठिकाणी सुई लागल्याने रक्ताची गाठ होणे किंवा सूज येणे यांसारखे धोके आता टळणार आहेत. आणीबाणीच्या परिस्थितीत (इमर्जन्सी कंडिशन) रुग्णाला तातडीने सलाईन लावणे आवश्यक असते, तिथे हे उपकरण लाईफ सेव्हर ठरू शकते.

चीन फ्युचरमध्ये जगतोय?

जगभरातील आरोग्यतज्ज्ञ चीनच्या या शोधाकडे पाहून थक्क झाले आहेत. सोशल मीडियावर अनेकजण म्हणत आहेत की, ‘चीन 2026 मध्ये नाही, तर 2036 च्या विचाराने जगत आहे.’ हे तंत्रज्ञान केवळ एका मशिनचा शोध नसून, रुग्णांच्या उपचाराची पद्धत बदलणारा एक क्रांतिकारी टप्पा आहे. या तंत्रज्ञानामुळे डॉक्टर आणि नर्सना अंदाजावर अवलंबून राहावे लागणार नाही. इंजेक्शन आणि सलाईन लावणे अधिक सुरक्षित होईल. लवकरच हे तंत्रज्ञान जगभरातील मोठ्या रुग्णालयांमध्ये उपलब्ध होणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news