North america bird decline | उत्तर अमेरिकेत पक्ष्यांच्या संख्येत मोठी घट

शेतीचे आधुनिकीकरण आणि हवामान बदल ठरताहेत घातक
North america bird decline |
North america bird decline | उत्तर अमेरिकेत पक्ष्यांच्या संख्येत मोठी घटStuart Duncan Smith
Published on
Updated on

वॉशिंग्टन : उत्तर अमेरिकेतील पक्ष्यांची संख्या झपाट्याने कमी होत असून, काही विशिष्ट भागांमध्ये हा वेग अधिकच वाढला असल्याचे एका नवीन अभ्यासातून समोर आले आहे. 26 फेब्रुवारी रोजी प्रसिद्ध झालेल्या ‘सायन्स’ या नियतकालिकातील अहवालानुसार, 1987 ते 2021 या काळात पक्ष्यांच्या संख्येत मोठी घट झाली आहे.

कॅलिफोर्निया, मिडवेस्ट आणि मिड-अटलांटिक यांसारख्या प्रमुख भागांमध्ये पक्षी नष्ट होण्याचे प्रमाण चिंताजनक आहे. या संशोधनातून पुढील मुख्य बाबी समोर आल्या आहेत : तीव्र शेतीचा परिणाम: ज्या भागात मोठ्या प्रमाणावर आणि आधुनिक पद्धतीने शेती केली जाते, तिथे पक्ष्यांच्या संख्येत सर्वाधिक घट दिसून आली आहे. युरोपमध्ये झालेल्या संशोधनाशी हे निष्कर्ष जुळणारे आहेत. हवामान बदलाचा फटका : वाढत्या तापमानामुळे आणि हवामान बदलामुळे अनेक पक्ष्यांच्या प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. उष्ण भागात ही घट अधिक तीव्रतेने जाणवत आहे. अडचणीत परिसंस्था : पक्षी हे निसर्गचक्रात महत्त्वाची भूमिका बजावतात. बियांचे प्रसारण करणे आणि कीटकांच्या संख्येवर नियंत्रण ठेवणे ही कामे पक्ष्यांमार्फत होतात. त्यांच्या अभावामुळे संपूर्ण परिसंस्थेवर परिणाम होऊ शकतो.

या संशोधनाचे मुख्य लेखक आणि ‘द ओहायो स्टेट युनिव्हर्सिटी’चे संशोधक फ्राँस्वा लेरॉय यांनी सांगितले की, ‘आम्ही केवळ पक्ष्यांच्या संख्येतील घटीबद्दल बोलत नाही आहोत, तर ही घट ज्या वेगाने होत आहे, तो वेग अधिक चिंतेचा विषय आहे. मानवी क्रियाकलाप वाढल्यामुळे पक्षी नष्ट होण्याचा वेग दिवसेंदिवस वाढत चालला आहे.’ लेरॉय आणि त्यांच्या सहकार्‍यांनी ‘नॉर्थ अमेरिकन ब—ीडिंग बर्ड सर्व्हे’च्या डेटाचा वापर करून हा नकाशा तयार केला. यामध्ये दरवर्षी जीवशास्त्रज्ञ आणि पक्षीप्रेमी ठरावीक मार्गांवर चालत जाऊन पक्ष्यांच्या नोंदी घेतात. 1980 च्या दशकाच्या उत्तरार्धापासून हा घटीचा आलेख कसा उंचावत गेला, हे या संशोधनाने स्पष्ट केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news