Nitrogen Tropical Tree Growth | नायट्रोजनच्या पुरवठ्यामुळे उष्णकटिबंधीय वृक्षांची वाढ होणार दुप्पट

कार्बन शोषण्याच्या क्षमतेत मोठी वाढ
Nitrogen Tropical Tree Growth |
Nitrogen Tropical Tree Growth | नायट्रोजनच्या पुरवठ्यामुळे उष्णकटिबंधीय वृक्षांची वाढ होणार दुप्पट
Published on
Updated on

पनामा सिटी : नव्याने पुनरुज्जीवित होणार्‍या उष्णकटिबंधीय जंगलांमध्ये जर नत्रवायूचा म्हणजेच नायट्रोजनचा अतिरिक्त पुरवठा केला, तर वृक्षांची वाढ दुप्पट होऊ शकते. यामुळे पुढील दशकभरात वातावरणातील कार्बन डायऑक्साईड शोषून घेण्याच्या त्यांच्या क्षमतेत प्रचंड वाढ होईल, असे एका नवीन संशोधनातून समोर आले आहे.

संशोधकांना असे आढळले की, ज्या जमिनीवर एक वर्षापूर्वी कुरणे होती अशा अतिशय तरुण जंगलांमध्ये नायट्रोजनयुक्त खतांचा वापर केल्यामुळे वृक्षांच्या जैविक वस्तुमानात 95 टक्के वाढ झाली. तसेच, 10 वर्षे जुन्या पुनरुज्जीवित होणार्‍या जंगलांमध्येही नत्राच्या वापरामुळे वाढीचा दर 48 टक्क्यांनी वाढल्याचे दिसून आले. युनिव्हर्सिटी ऑफ लीडस्मधील सहयोगी प्राध्यापक आणि मुख्य संशोधक सारा बॅटरमॅन यांनी सांगितले की, ‘हवामान स्थिर ठेवण्यासाठी आपण सर्वजण उष्णकटिबंधीय जंगलांवर अवलंबून आहोत.

ही जंगले जगातील एकूण वन-कार्बनपैकी अर्धा भाग साठवतात आणि मानवनिर्मित उत्सर्जनापैकी 20 टक्के कार्बन शोषून घेतात. मात्र, भविष्यात ही जंगले कार्बन शोषून घेतील की स्वतःच कार्बन उत्सर्जनाचा स्रोत बनतील, याबाबत अनिश्चितता आहे. पोषक घटकांमुळे ही जंगले कार्बन साठवण्यास किती मदत करतात, हे समजून घेणे महत्त्वाचे आहे. ‘स्मिथसोनियन ट्रॉपिकल रिसर्च इन्स्टिट्यूट’च्या संशोधकांनी सलग चार वर्षे पनामा कालव्याच्या पाणलोट क्षेत्रात वृक्षांच्या आणि वेलींच्या वाढीचा मागोवा घेतला. यामध्ये त्यांनी नायट्रोजन, फॉस्फरस आणि या दोन्हींच्या मिश्रणाचा वापर करून झाडांच्या वाढीवर होणार्‍या परिणामांचा अभ्यास केला.

संशोधनात पुढील प्रकारच्या वनक्षेत्रांचा समावेश होता : 1 वर्षापेक्षा कमी काळ झालेली नवीन जंगले, 10 वर्षे जुनी पुनरुज्जीवित जंगले, 30 वर्षे जुनी पुनरुज्जीवित जंगले, 600 वर्षे जुनी प्राचीन जंगले. दरवर्षी तीन महिने संशोधक पथके या डोंगराळ भागात जाऊन झाडांना खते घालत होती आणि त्यांच्या खोडांची मोजमाप घेत होती. ‘अतिशय उष्ण हवामान, घाम आणि डासांचा त्रास सहन करत हे काम करावे लागले,’ असे बॅटरमॅन यांनी आव्हानांविषयी बोलताना नमूद केले. झाडांच्या खोडाच्या व्यासावरून संशोधक त्या झाडांचे वजन आणि पर्यायाने त्यांनी साठवलेल्या कार्बनचे प्रमाण मोजू शकले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news