कोरोनानंतर आता वटवाघळं फैलावत आहेत ‘हा’ विषाणू

हा विषाणू 90 टक्के रुग्णांसाठी घातक
new virus found spreading in Africa thanks to bats
वटवाघळांमुळे एक नवा विषाणु आफ्रिकेत फैलावलेला आढळला. File Photo
Published on
Updated on

वॉशिंग्टन : वटवाघळं म्हणजे वेगवेगळ्या विषाणूंची जिवंत थैलीच असतात, असे म्हटले जाते व ते खरेही आहे. गेल्या काही वर्षांत कोरोनाने अवघ्या जगभरात धुमाकूळ घातल्याचं पाहायला मिळालं. ‘सार्स-कोव्ह-2’ हा ‘कोव्हिड-19’ ला जबाबदार कोरोना विषाणूही वटवाघळामधूनच आला असे म्हणणारे अनेक लोक आहेत. कोरोनाची दहशत कमी होत असतानाच आता आणखी एक नवी समस्या दार ठोठावत आहे. वटवाघळांमुळे आता एक नवा विषाणु आफ्रिकेत फैलावलेला आढळला असून त्याचे नाव ’मारबर्ग’ असे आहे. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, 90 टक्के रुग्णांसाठी तो घातक आहे. जगात आतापर्यंत 8 रुग्णांचा यामुळे मृत्यू झाला आहे.

या विषाणूमुळे रुग्णांना ताप, तोंडाची चव कमी होणे, तीव्र डोकेदुखी, अंगदुखी अशा समस्यांचा सामना करावा लागतो. तसेच जुलाब, पोटात मुरड येणे, उलट्या आणि पोटदुखी यांसारखी लक्षणेही दिसतात. सध्या मारबर्ग विषाणू रवांडा, पूर्व आफ्रिकेत पसरला आहे. येथील परिस्थिती पाहून जागतिक आरोग्य संघटनेने आफ्रिकन देशांमध्ये त्याच्या धोक्याबाबत अलर्ट जारी केला आहे. जागतिक आरोग्य संघटनेने मास्क घालण्याचा आणि सामाजिक अंतर राखण्याचा सल्ला दिला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, रवांडामध्ये आतापर्यंत 26 प्रकरणांची पुष्टी झाली आहे. संघटनेच्या अहवालानुसार, हा संसर्ग रवांडाच्या 30 जिल्ह्यांमध्ये पसरला आहे. 26 पैकी 20 रुग्णांची प्रकृती चिंताजनक आहे. सध्या रवांडामधील रुग्णांना आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले आहे. याशिवाय संक्रमित लोकांच्या संपर्कात आलेल्या सुमारे 160 लोकांवर नजर ठेवण्यात येत आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news