मानवी शरीरात नवीन प्रकारच्या चरबी पेशींचा शोध

या पेशी लठ्ठपणाशी संबंधित असू शकतात
new-type-of-fat-cells-discovered-in-human-body
new-type-of-fat-cells-discovered-in-human-bodyPudhari File Photo
Published on
Updated on

वॉशिंग्टन : माणसाला अद्यापही आपल्याच शरीराची पूर्ण माहिती नाही. त्यामुळेच वेळोवेळी आतापर्यंत अज्ञात असलेल्या काही अवयवांचा शोध लागत असतो. आता शास्त्रज्ञांनी मानवी शरीरात चरबीच्या अनोख्या उपप्रकारांचा शोध घेतला आहे. त्यांच्या कार्यप्रणाली समजून घेतल्यावर असे आढळले की या पेशी लठ्ठपणाशी संबंधित असू शकतात.

‘नेचर जेनेटिक्स’ या वैज्ञानिक जर्नलमध्ये नुकत्याच प्रकाशित झालेल्या या संशोधनामुळे लठ्ठपणाच्या परिणामांवर, जसे की जळजळ, सूज किंवा इन्सुलिन रेझिस्टन्स, नियंत्रण ठेवण्यासाठी नवीन उपचार विकसित करण्याचा मार्ग मोकळा होऊ शकतो, असे शास्त्रज्ञांचे मत आहे. ‘या चरबीच्या उपप्रकारांचा शोध लागणे हे खूपच आश्चर्यकारक आहे,’ असे या संशोधनाच्या सहलेखिका आणि बेन-गुरियन युनिव्हर्सिटी ऑफ नेगेव येथील संगणकीय जीवशास्त्राच्या प्राध्यापिका एस्ती येगर-लोतेम यांनी सांगितले. ‘यामुळे भविष्यात संशोधनाच्या अनेक संधी उपलब्ध होऊ शकतात.‘चरबी पेशी’ या पूर्वीच्या समजुतीपेक्षा जास्त गुंतागुंतीच्या आणि विविध प्रकारच्या असतात, असे कॉर्नेल विद्यापीठाचे पोषण विज्ञानाचे प्राध्यापक डॅनियल बेरी यांनी नमूद केले.

संशोधकांनी असेही लक्षात घेतले आहे की, शरीरातील सर्व प्रकारच्या चरबी समान नसतात. उदाहरणार्थ, पोटाच्या आतील अवयवांजवळ साठणारी व्हिसेरल चरबी ही त्वचेखालील (सबक्युटेनियस) चरबीपेक्षा अधिक धोकादायक असते. व्हिसेरल चरबीमुळे हृदयविकाराचा झटका, स्ट्रोक, मधुमेह, यकृताच्या समस्या आणि इन्सुलिन रेझिस्टन्सचा धोका वाढतो. चरबी पेशींमध्ये नक्की काय घडते हे समजून घेण्यासाठी येगर-लोतेम आणि त्यांच्या सहकार्‍यांनी ‘सेल अ‍ॅटलास’ तयार केला, जो मानवी शरीरातील सर्व पेशींचे नकाशे तयार करण्याच्या जागतिक प्रकल्पाचा एक भाग आहे. संशोधकांनी सिंगल-न्युक्लियस ठछअ सिक्वेन्सिंग तंत्रज्ञानाचा वापर करून चरबी पेशींचे मॅपिंग केले. यामध्ये त्यांनी पेशींच्या ‘आरएनए’चा अभ्यास केला, जो त्या पेशींच्या कार्यक्षमतेबाबत महत्त्वाची माहिती पुरवतो. 15 लोकांच्या पोटातील चरबीच्या पेशींच्या नमुन्यांचे परीक्षण करताना, संशोधकांना आढळले की बहुतांश चरबी पेशी पारंपरिक स्वरूपाच्या होत्या. त्यांचे मुख्य कार्य अतिरिक्त ऊर्जा साठवणे हे होते. मात्र, काही प्रमाणात ‘नॉन-क्लासिकल’ चरबी पेशी आढळल्या, ज्या ऊर्जा साठवण्याव्यतिरिक्त इतर कार्येही करत होत्या. गेल्या काही दशकांत संशोधनाने हे सिद्ध केले आहे की चरबी ऊती फक्त ऊर्जा साठवण्याचे काम करत नाहीत, तर त्या मेंदू, स्नायू आणि यकृताशी संवाद साधत शरीरातील चयापचय, भूक आणि वजन यांचे नियंत्रण करतात. त्यामुळे, चरबी ऊतींमध्ये काही गडबड झाल्यास, त्याचा शरीरातील इतर भागांवरही परिणाम होऊ शकतो, असे येगर-लोतेम यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news