New lizard species | आंध्र प्रदेशमध्ये पालीच्या नव्या प्रजातीचा शोध

new lizard species
New lizard species | आंध्र प्रदेशमध्ये पालीच्या नव्या प्रजातीचा शोध
Published on
Updated on

कोलकाता: येथील भारतीय प्राणी सर्वेक्षण (ZSI) च्या वैज्ञानिकांनी आंध्र प्रदेशमध्ये एका लहान, सडपातळ पालीच्या (Thin Gecko) नव्या प्रजातीचा शोध लावला आहे. आंध्र प्रदेशातील शेषाचलम बायोस्फीयर रिझर्व्ह अंतर्गत येणार्‍या तिरुमाला पर्वतरांगांमध्ये ही नवी प्रजाती आढळली. ही पालीची प्रजाती हेमीफिलोडॅक्टायलस (Hemiphyllodactylu) या वंशाशी संबंधित आहे. या प्रजातीचे अधिकृत नाव ‘हेमीफिलोडेक्टाइलस वेंकटाद्रि स्पेसीज नोव’ (Hemiphyllodactylus venkataradrii species nov) असे ठेवण्यात आले आहे.

तिरुमाला येथील पवित्र वेंकटाद्रि पर्वताबद्दल आदर व्यक्त करण्यासाठी हे नाव देण्यात आले आहे. ‘वेंकटाद्रि’ हे नाव संस्कृत शब्द ‘वेंकट’ (ज्याचा अर्थ ‘पापे दूर करणारा’) यावरून आले आहे. हा शोध ZSI चे ‘फ—ेशवॉटर बायोलॉजी रिजनल सेंटर’ (हैदराबाद), रेप्टिलिया विभाग (कोलकाता) आणि फकीर मोहन विद्यापीठ (ओडिशा) यांच्या संयुक्त चमूच्या प्रयत्नातून साकारला गेला. या शोधाबद्दलची माहिती आंतरराष्ट्रीय नियतकालिक ‘हरपेटोजोआ’ (खंड 38, 2025) मध्ये प्रकाशित झाली आहे.

आण्विक विश्लेषणातून (Molecular Analysis) या सरड्याची एक वेगळी प्रजाती म्हणून पुष्टी झाली आहे. या प्रजातीमध्ये द्वीपकल्पीय (Peninsular) भारतातील तिच्या जवळच्या प्रजातींपेक्षा 9.7-12.9 टक्के जनुकीय फरक (विचलन) आढळून येतो. या जवळच्या प्रजातींमध्ये एच. ज्ञान, एच. नीलगिरिपुंसिस आणि एच. प्रायद्वीपीय यांचा समावेश आहे. ZSI च्या संचालिका धृती बॅनर्जी यांनी सांगितले की, ‘आंध्र प्रदेशात हेमीफिलोडॅक्टायलस वंशाची म्हणून ओळखली गेलेली ही दुसरीच प्रजाती आहे. यापूर्वी पहिली प्रजाती एच. अराकुएन्सिस ही होती.’

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news