Space Race : नवी ‌‘स्पेस रेस‌’ वाढवतेय पृथ्वीचे संकट

हजारो सॅटेलाईटस्‌‍ जळल्यामुळे पर्यावरणाला धोका
Space Race
Space Race
Published on
Updated on

नवी दिल्ली : पृथ्वीच्या कक्षेमध्ये सध्या एक मोठी स्पर्धा सुरू आहे. परंतु याचे परिणाम केवळ अंतराळापुरते मर्यादित न राहता पृथ्वीच्या वातावरणावरही होऊ शकतात. जगभरात हाय स्पीड इंटरनेट आणि डेटा सेवा देण्यासाठी व्यावसायिक कंपन्यांचे ‌‘मेगा कॉन्स्टेलेशन‌’ (सॅटेलाईटस्‌‍चा समूह) वेगाने वाढत आहेत. मात्र, या उपग््राहांचे वाढते प्रमाण आता शास्त्रज्ञांसाठी चिंतेचा विषय बनले आहे.

सध्या पृथ्वीच्या भोवती सुमारे 15,000 सक्रिय सॅटेलाईटस्‌‍ फिरत आहेत. यातील अनेक उपग््राह केवळ काही वर्षांसाठी डिझाईन केलेले असतात. त्यांचे काम संपल्यानंतर किंवा ते खराब झाल्यानंतर, ‌‘लो-अर्थ ऑर्बिट‌’मधील कचरा कमी करण्यासाठी त्यांना जाणीवपूर्वक पृथ्वीच्या वातावरणात ढकलले जाते. तिथे ते जळून खाक होतात. या प्रक्रियेला इंजिनिअरिंगच्या भाषेत ‌‘डिमिसेबिलिटी‌’ म्हटले जाते. ‌‘द कन्व्हर्सेशन‌’मध्ये प्रसिद्ध झालेल्या एका अभ्यासानुसार, दरवर्षी हजारो सॅटेलाईटस्‌‍ वातावरणात जळल्यामुळे धातूचे सूक्ष्म कण निर्माण होत आहेत. 2023 मध्ये वैज्ञानिकांना वातावरणाच्या वरच्या थरात धातूचे अंश सापडले आहेत, ज्यांचा संबंध अंतराळयानांशी आहे. सॅटेलाईट बनवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर ॲल्युमिनियम वापरले जाते. जळताना त्याचे रूपांतर ‌‘ॲल्युमिना‌’ कणांमध्ये होते. ते दीर्घकाळ वातावरणात तरंगत राहू शकतात. हे कण ओझोनचा थर आणि हवामान बदलाच्या पॅटर्नवर गंभीर परिणाम करू शकतात. कंपन्या त्यांच्या उपग््राहांमध्ये कोणत्या साहित्याचा वापर करतात याची पूर्ण माहिती जाहीर करत नसल्याने या धोक्याचा अचूक अंदाज लावणे कठीण होत आहे.

2025 च्या सुरुवातीला, ‌‘स्पेस एक्स‌’ने आपल्या ‌‘स्टारलिंक‌’ नेटवर्कचा विस्तार करण्यासाठी अमेरिकन फेडरल कम्युनिकेशन्स कमिशनकडे परवानगी मागितली आहे. या प्रस्तावानुसार, भविष्यात तब्बल 10 लाख अतिरिक्त सॅटेलाईटस्‌‍ तैनात केले जाऊ शकतात. सध्याच्या एका स्टारलिंक सॅटेलाईटचे वजन सुमारे 800 किलो आहे, तर आगामी मॉडेल अधिक जड असतील. शास्त्रज्ञांच्या मते, जर 10 लाख सॅटेलाईटस्‌‍ अवकाशात सोडले गेले, तर त्यांच्या जळण्यामुळे वातावरणात सुमारे 1 टेराग््रााम ॲल्युमिना जमा होऊ शकतो. हे उत्सर्जन रॉकेट लाँचमधून होणाऱ्या प्रदूषणाव्यतिरिक्त असेल. केवळ प्रदूषणच नव्हे, तर उपग््राहांच्या वाढत्या संख्येमुळे अंतराळात एकमेकांवर आदळण्याचा धोकाही वाढला आहे. शास्त्रज्ञांनी ‌‘केसलर सिंड्रोम‌’बद्दल इशारा दिला आहे. यामध्ये एका टक्करमुळे निर्माण झालेला कचरा इतर अनेक टकरींना कारणीभूत ठरू शकतो. तसेच सर्वच उपग््राह वातावरणात पूर्णपणे जळत नाहीत. त्यांचे काही अवशेष जमिनीवर पडून नागरिक किंवा विमानांना इजा पोहोचवण्याची शक्यताही भविष्यात वाढू शकते, असे या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news