नव्या किरणोत्सारी धातूचा लागला शोध

Published on
Updated on

वॉशिंग्टन : बर्कले लॅबमधील वैज्ञानिकांच्या एका पथकाने नव्या धातूचा शोध लावला आहे. या धातूला महान संशोधक अल्बर्ट आईन्स्टाईन यांचे नाव दिले आहे. 'आईन्स्टिनियम' नावाचा हा धातू सर्वप्रथम हायड्रोजन बॉम्बच्या अवशेषांमध्ये 1952 मध्ये मिळाला होता. मात्र, त्याच्या सर्व वैशिष्ट्यांसह तपशीलवार माहिती आता उपलब्ध झाली आहे. 

1 नोव्हेंबर 1952 मध्ये प्रशांत महासागरात या हायड्रोजन बॉम्बचा स्फोट घडवून आणण्यात आला होता. एका चाचणीवेळी घडवलेल्या या स्फोटानंतर त्याच्या अवशेषांमधून वेगळा आणि विचित्र दिसणारा धातू सापडला होता. अतिशय किरणोत्सर्गी असलेल्या या धातूबाबत त्यावेळेपासून सातत्याने संशोधन केले जात होते. हा धातू अतिशय सक्रिय असल्याने त्यावर संशोधन करणे कठीण होत होते. आता त्याबाबतच्या संशोधनाची माहिती 'नेचर' या नियतकालिकामध्ये प्रसिद्ध करण्यात आली आहे. प्रशांत महासागरातील 'इलुजेलॅब' या बेटावर हायड्रोजन बॉम्बची चाचणी घेण्यात आली होती. त्याचा स्फोट दुसर्‍या महायुद्धाच्या काळात जपानच्या नागासाकी शहरावर टाकलेल्या अणुबॉम्बच्या स्फोटापेक्षा 500 पटीने अधिक मोठा होता.

स्फोटानंतर बॉम्बचे अवशेष गोळा करण्यात आले व ते कॅलिफोर्नियाच्या बर्कलेमधील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले. संशोधकांना त्यामध्ये नवा धातू सापडला व त्यामधील दोनशेपेक्षा अधिक अणू महिनाभरातच शोधण्यात आले. मात्र, त्यानंतर लवकर संशोधन होऊ शकले नाही. याचे कारण म्हणजे त्यापासून सतत किरणोत्सर्ग होत होता. संशोधकांनी त्याच्या 250 नॅनोमीटरपेक्षाही कमी प्रमाणातील भाग घेऊन संशोधन सुरू केले. आता इतक्या वर्षांच्या मेहनतीनंतर या चांदीच्या रंगाच्या आणि अतिशय मुलायम अशा या धातूची तपशीलवार माहिती समोर आली आहे. तो अंधारात निळसर रंगाचा दिसतो, हे विशेष.

 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news