Quantum Refrigerator | नवा ‘क्वांटम फ्रिज’ अंतराळातील अतिथंड तापमानापेक्षाही थंड!

सुपरकॉम्प्युटरपेक्षाही वेगाने काम करणाऱ्या तंत्रज्ञानाचा मार्ग मोकळा
Quantum Refrigerator |
Quantum Refrigerator | नवा ‘क्वांटम फ्रिज’ अंतराळातील अतिथंड तापमानापेक्षाही थंड!
Published on
Updated on

वॉशिंग्टन : ‘आयबीएम’ या जागतिक तंत्रज्ञान कंपनीने एक नवीन मॉड्युलर आणि अत्यंत थंड प्रणाली विकसित केली आहे. ही प्रणाली शेकडो क्वांटम संगणक चिप्सना एकमेकांशी जोडण्यासाठी तयार करण्यात आली असून, यामुळे या क्षेत्रातील पायाभूत सुविधांमधील एक मोठा अडथळा दूर होण्यास मदत होणार आहे. हे तंत्रज्ञान अवकाशातील अतिथंड तापमानापेक्षाही तब्बल २०० पट अधिक थंड आहे.

कंपनीच्या माहितीनुसार, या नवीन ‘क्वांटम फ्रिज’मुळे वर्ष २०२९ पर्यंत जगातील पहिला ‘फॉल्ट-टॉलरंट’ (त्रुटी-मुक्त) क्वांटम संगणक तयार करणे शक्य होईल. या स्थिर प्रणाली ‘क्वांटम एरर करेक्शन’ तंत्रज्ञानाचा वापर करून संगणकीय प्रक्रियेदरम्यान येणारे अडथळे आणि त्रुटी रिअल-टाईममध्ये दुरुस्त करतील, ज्यामुळे कोणत्याही व्यत्ययाशिवाय क्वांटम ऑपरेशन्स सुरू राहू शकतील. त्रुटी-मुक्त यंत्रणा विकसित झाल्यास संगणक शास्त्रज्ञांना विविध क्षेत्रांमध्ये नवीन संशोधन करणे सोपे जाईल.

मग ते रसायनशास्त्र असो, साहित्य विज्ञान असो किंवा सैद्धांतिक भौतिकशास्त्र असो; अत्याधुनिक सुपरकॉम्प्युटरच्या क्षमतेपलीकडील गुंतागुंतीची कामे संशोधकांना कोणत्याही चुकांची भीती न बाळगता अचूकपणे करता येतील. आतापर्यंत कोट्यवधी ऑपरेशन्स बिनचूकपणे पूर्ण करू शकणारे सुपरकंडक्टिंग क्वांटम संगणक तयार करण्याच्या मार्गात पायाभूत सुविधांची मोठी अडचण होती. आयबीएमच्या प्रतिनिधींनी दिलेल्या माहितीनुसार, या नव्या मॉड्युलर आणि एकमेकांशी जोडल्या जाणाऱ्या ‘क्वांटम फ्रिज’मुळे ही समस्या यशस्वीपणे सुटली आहे.

logo
Pudhari News
pudhari.news