Amazon wildlife: ॲमेझॉनच्या जंगलात आढळली महाकाय ॲनाकोंडाची नवीन प्रजाती

विल स्मिथच्या डॉक्युमेंटरीमधून थरारक दृश्ये समोर
Amazon wildlife
Amazon wildlife: ॲमेझॉनच्या जंगलात आढळली महाकाय ॲनाकोंडाची नवीन प्रजातीPudhari
Published on
Updated on

इक्वेडोर : ॲमेझॉनच्या घनदाट जंगलातून विज्ञानाला थक्क करणारी एक बातमी समोर आली आहे. शास्त्रज्ञांनी इक्वेडोरमधील ॲमेझॉन पर्जन्यवनात ॲनाकोंडाची एक पूर्णपणे नवीन प्रजाती शोधून काढली आहे. नॅशनल जिओग्राफिकच्या आगामी ‌‘पोल टू पोल विथ विल स्मिथ‌‘ या डॉक्युमेंटरीमध्ये या शोधाचा थरारक क्षण पहिल्यांदाच कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

2022 मध्ये शास्त्रज्ञांचे एक पथक ॲनाकोंडाच्या जनुकीय अभ्यासासाठी नमुने गोळा करत होते. समोर आलेल्या व्हिडीओमध्ये विषयतज्ज्ञ बायन फ्राय आणि प्रसिद्ध हॉलीवूड अभिनेता विल स्मिथ हे स्थानिक ‌‘वाओरानी‌’ मार्गदर्शकांसोबत एका गढूळ नदीतून बोटीने प्रवास करताना दिसतात. यावेळी त्यांना किनाऱ्यावर एक महाकाय मादी ॲनाकोंडा दिसून आली. या ॲनाकोंडाची लांबी साधारणपणे 16 ते 17 फूट होती.

मार्गदर्शकांनी मोठ्या शिताफीने या सापाला पकडून ठेवले, जेणेकरून संशोधकांना त्याच्या शरीरावरील खवल्यांचा नमुना घेता येईल. जरी हा साप बिनविषारी असला, तरी तो आपल्या शरीराच्या विळख्याने भक्ष्याचा श्वास कोंडून त्याला मारण्यात अत्यंत पटाईत असतो. आतापर्यंत जगभरात ‌‘ग््राीन ॲनाकोंडा‌’ची एकच प्रजाती असल्याचे मानले जात होते. मात्र, या मोहिमेत गोळा केलेल्या नमुन्यांच्या तपासणीतून धक्कादायक वास्तव समोर आले आहे. ग्रीन ॲनाकोंडाच्या आता दोन स्वतंत्र प्रजाती आहेत :

1. युनेक्टेस मुरिनस (Eunectes murinus): ही आधीपासून माहीत असलेली ‌‘दक्षिण ग्रीन ॲनाकोंडा‌’ प्रजाती.

2. युनेक्टेस अकायिमा (Eunectes akayima): ही नव्याने शोधलेली ‌‘उत्तर ग्रीन ॲनाकोंडा‌’ प्रजाती. द युनिव्हर्सिटी ऑफ क्वीन्सलँडमधील प्राध्यापक बायन फ्राय यांनी सांगितले की, या दोन प्रजाती सुमारे 1 कोटी वर्षांपूर्वी एकमेकांपासून वेगळ्या झाल्या आहेत. त्यांच्या डीएनएमध्ये तब्बल 5.5 टक्के फरक आढळला आहे. ‌‘हा फरक किती मोठा आहे हे समजून घेण्यासाठी एक उदाहरण पुरेसे आहे.

मानव आणि चिम्पांझी यांच्या डीएनएमध्ये केवळ 2 टक्के फरक असतो. त्या तुलनेत या दोन ॲनाकोंडा प्रजातींमधील फरक प्रचंड आहे,‌’ असे फ्राय यांनी स्पष्ट केले. ‌‘एखाद्या नवीन प्रजातीचा शोध घेणे म्हणजे नेहमी फक्त शोधमोहीम नसते, तर ती एक कठोर वैज्ञानिक प्रक्रिया असते जिथे नशिबाचीही साथ लागते,‌’ असे फ्राय यांनी नमूद केले. हा शोध भविष्यात ॲमेझॉनमधील जैवविविधतेच्या संरक्षणासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news