Mount Everest Summit | नेपाळच्या कामी रित्तो यांचा एव्हरेस्टवर 32व्यांदा झेंडा

Mount Everest Summit | नेपाळच्या कामी रित्तो यांचा एव्हरेस्टवर 32व्यांदा झेंडा
Published on
Updated on

काठमांडू : नेपाळचे जगप्रसिद्ध शेर्पा गाईड कामी रित्तो यांनी रविवारी जगातील सर्वात उंच शिखर माउंट एव्हरेस्टवर तब्बल 32 व्यांदा यशस्वी चढाई करून एक नवा आणि अभूतपूर्व जागतिक विक्रम प्रस्थापित केला आहे. 56 वर्षीय कामी रित्तो यांनी गेल्याच वर्षी स्वतः रचलेला 31 वेळा चढाई करण्याचा विक्रम मोडीत काढला आहे.

पर्यटन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, 14 पीक्स एक्स्पेडिशन या कंपनीच्या विदेशी गिर्यारोहकांना मार्गदर्शन करत असताना रविवारी सकाळी 10:12 वाजता कामी रित्तो यांनी 8,849 मीटर (29,032 फूट) उंच एव्हरेस्ट शिखरावर पाऊल ठेवले.

महिलांमध्ये लाकपांचा विक्रम

याच मोहिमेदरम्यान 52 वर्षीय शेर्पा महिला लाकपा यांनीही 11 व्यांदा एव्हरेस्ट सर केले. महिला गटामध्ये जगातील सर्वाधिक वेळा एव्हरेस्ट सर करण्याचा विक्रम आता त्यांच्या नावावर नोंदवला गेला आहे. रित्तो यांचा जन्म सोलुखुंबू जिल्ह्यातील थामे गावात झाला आहे. याच गावात 1953 मध्ये एडमंड हिलरी यांच्यासोबत पहिल्यांदा एव्हरेस्ट सर करणारे तेनझिंग नोर्गे यांचाही जन्म झाला होता. रित्तो यांनी 1994 मध्ये पहिल्यांदा एव्हरेस्टवर चढाई केली होती. त्यानंतर 2014, 2015 (भूकंप आणि नैसर्गिक आपत्ती) आणि 2020 (कोरोना महामारी) ही वर्षे वगळता त्यांनी दरवर्षी एव्हरेस्ट सर केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news