

स्टॅनफोर्ड : जगातील शास्त्रज्ञ गेल्या अनेक दशकांपासून ज्या गोष्टीची प्रतीक्षा करत होते, तो ‘युनिव्हर्सल व्हॅक्सिन’चा शोध आता पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. संशोधकांनी एका अशा नाझल स्प्रे व्हॅक्सिनचा (नाकावाटे घेण्याची लस) विकास केला आहे, जो केवळ कोरोनाच नव्हे, तर एन्फ्लूएंझा (फ्लू), साधी सर्दी, फुफ्फुसांचे जिवाणू संसर्ग आणि अगदी अॅलर्जीपासूनही संरक्षण देऊ शकतो.
‘सायन्स’ या प्रसिद्ध शोधपत्रिकेत प्रसिद्ध झालेल्या या संशोधनानुसार, उंदरांवर करण्यात आलेल्या प्राथमिक चाचण्यांमध्ये या लसीने अभूतपूर्व यश मिळवले आहे. दरवर्षी फ्लूची लस घेणे किंवा कोरोनाच्या बदलत्या व्हेरिएंटनुसार बूस्टर डोस घेणे, हे आता इतिहास जमा होऊ शकते. स्टॅनफोर्ड मेडिसिनमधील सूक्ष्मजीवशास्त्र आणि रोगप्रतिकारशास्त्र विषयाचे प्राध्यापक बाली पुलेंद्रन यांनी सांगितले की, ‘आमच्याकडे आता विविध श्वसन विकारांविरुद्ध लढणारी एक वैश्विक लस तयार आहे. ही लस मानवासाठी यशस्वी ठरल्यास, ती पुढील संभाव्य महासाथींविरुद्ध एक तयार ढाल म्हणून काम करेल.’
1790 पासून आजवरच्या सर्व लसी या ‘अँटिजेन स्पेसिफिसिटी’वर आधारित होत्या. म्हणजे एखादा विशिष्ट विषाणू शरीरात शिरला की त्याला ओळखून मारण्यासाठी शरीराला प्रशिक्षण दिले जायचे. मात्र, विषाणू स्वतःचे रूप बदलतो आणि जुनी लस निकामी ठरते. पुलेंद्रन यांच्या पथकाने ही पद्धतच बदलली आहे. त्यांनी विशिष्ट विषाणूला लक्ष्य करण्याऐवजी, शरीरातील रोगप्रतिकारशक्ती पेशी एकमेकांशी जो संवाद साधतात, त्या प्रक्रियेची नक्कल केली आहे. यामुळे शरीराची नैसर्गिक संरक्षण प्रणाली कोणत्याही धोक्याशी (विषाणू, जिवाणू किंवा अॅलर्जी) लढण्यासाठी सज्ज होते. आपल्या शरीरात दोन प्रकारची रोगप्रतिकारशक्ती असते: 1. अॅडॉप्टिव्ह : ही विशिष्ट शत्रूला ओळखते (उदा. कोरोना), पण तिला सक्रिय व्हायला दोन आठवडे लागतात.
2. इनेट : ही प्रणाली शरीरात कोणताही धोका शिरताच काही मिनिटांत सक्रिय होते. मात्र, ती फार काळ टिकत नाही, असे मानले जात होते. संशोधकांनी विकसित केलेली ही नवीन लस ‘इनेट’ रोगप्रतिकार यंत्रणेला अधिक शक्तिशाली बनवते, ज्यामुळे फुफ्फुसांवर होणार्या कोणत्याही हल्ल्याला शरीर तातडीने आणि प्रभावीपणे प्रत्युत्तर देऊ शकते. पुलेंद्रन यांच्या पथकाने चाचणी केलेली ॠङअ-3 च-052- ङड+ जतअ नावाची ही नवीन लस पेशींमधील संवाद प्रक्रियेची कृत्रिमरीत्या नक्कल करते. यात अशा संयुगांचा समावेश आहे जे फुफ्फुसांमधील ‘इनेट’ रोगप्रतिकार पेशींना थेट उत्तेजित करतात आणि त्यांना हाय अलर्टवर ठेवतात.