

वॉशिंग्टन : अमेरिकेची अंतराळ संस्था ‘नासा’ पृथ्वीवरील ज्वालामुखी स्फोटांचे वेळीच भाकीत करून लाखो जीवांचे रक्षण करण्याच्या दिशेने मोठे आणि महत्त्वाचे पाऊल पुढे टाकत आहे. अंतराळातून सतत निरीक्षण करून, नासा पृथ्वीच्या हवामान बदलांचा व पर्यावरणाचा अभ्यास करत असून, ज्वालामुखीच्या स्फोटाचा वेळीच इशारा देण्यासाठी अतिशय अद्ययावत तंत्रज्ञान वापरत आहे.
शास्त्रज्ञ अशीही शक्यता तपासत आहेत की, झाडांच्या पानांमध्ये दिसणारे बदल ज्वालामुखी स्फोटाचे भाकीत करू शकतात का? नासाचे विविध उपग्रह आणि यंत्रणा, जसे की ‘लँडसॅट’ 8 आणि 9, सक्रिय ज्वालामुखींवर सीमंत निरीक्षण ठेवत आहेत. हे उपग्रह ज्वालामुखीच्या आत राखेच्या साठ्यांचे उच्च दर्जाचे प्रतिमांच्या मदतीने निरीक्षण करतात. एवढेच नाही, तर सेंटिनेल-5 पी या उपग्रहामुळे वातावरणातील सल्फर डाय ऑक्साईडसारख्या वायूंची चोख पाळत राहता येते.
या अत्याधुनिक तंत्रज्ञानाबरोबरच GOES- R सीरिजद्वारा नासा रिअल टाईममध्ये वायूमध्ये पसरणार्या राखेच्या ढगांचा मागोवा घेत आहे. नासाच्या अर्थ सायन्स डिव्हिजनचे प्रमुख, फ्लोरियन श्वांडनर यांच्या मते, सध्या चार्टावर ज्वालामुखीचे लवकर इशारा प्रणाली अस्तित्वात असल्या तरी त्या अधिक सक्षम करण्यासाठी नासाचे प्रयत्न सुरू आहेत. या सर्व मोहिमेमुळे ज्वालामुखी स्फोटांमुळे निर्माण होणार्या आपत्तीच्या जोखमीचे मूल्यमापन अधिक नेमकेपणाने करणे शक्य होईल आणि भविष्यात लाखो लोकांचे प्राण वाचण्यास मोठी मदत होईल.