Voyager 2 Mission | ‘व्हॉयेजर २’चे आयुष्य वाढवले; आता ‘व्हॉयेजर १’च्या बचावाची तयारी

अब्जावधी मैलांवरून ‘नासा’चा ‘बिग बँग’ प्रयोग यशस्वी
Voyager 2 Mission |
Voyager 2 Mission | ‘व्हॉयेजर २’चे आयुष्य वाढवले; आता ‘व्हॉयेजर १’च्या बचावाची तयारी
Published on
Updated on

वॉशिंग्टन : अवकाशात मानवाचा सर्वात दूरचा प्रतिनिधी मानल्या जाणाऱ्या ‘व्हॉयेजर १’ या अंतराळयानाला वाचवण्यासाठी शास्त्रज्ञांनी आता कंबर कसली आहे. याआधी अब्जावधी मैल दूर असलेल्या त्याच्या जुळ्या ‘व्हॉयेजर २’ या यानाला यशस्‍वीरीत्या पूर्ववत करण्यात ‘नासा’च्या शास्त्रज्ञांना मोठे यश मिळाले आहे.

‘नासा’ने ४ ऑगस्ट रोजी दिलेल्या अधिकृत माहितीनुसार, ‘बिग बँग’ नावाच्या एका अत्यंत हुशार ऊर्जा-बचत तंत्राचा वापर करून ‘व्हॉयेजर २’वरील तीन महत्त्वाच्या वैज्ञानिक उपकरणांपैकी एक उपकरण या वर्षाच्या अखेरीस बंद होण्यापासून वाचवण्यात आले आहे. ‘बिग बँग’ या प्रक्रियेत अंतराळयानावरील काही जास्त ऊर्जा लागणारी उपकरणे निवडकपणे बंद केली जातात आणि त्यांच्याऐवजी कमी ऊर्जा लागणाऱ्या पर्यायी यंत्रणा सुरू केल्या जातात. याद्वारे आंतरतारकीय अवकाशातील अत्यंत गोठवणाऱ्या थंडीतही यानाचे तापमान कार्यक्षम राहू शकते आणि शास्त्रज्ञांना डेटा मिळणे सुरू राहते.

‘या कल्पनेचा मुख्य उद्देश एकाचवेळी अनेक ऊर्जा वापरणाऱ्या उपकरणांची अदलाबदल करणे हा आहे. म्हणूनच याला ‘बिग बँग’ असे नाव दिले गेले. काही गोष्टी बंद करून कमी ऊर्जेचे पर्याय वापरल्यामुळे यान उबदार राहते आणि वैज्ञानिक संशोधन सुरू ठेवता येते,’ असे या मोहिमेचे व्यवस्थापन करणाऱ्या ‘नासा’च्या ‘जेट प्रोपल्शन लॅबोरेटरी’ (JPL) च्या प्रतिनिधींनी स्पष्ट केले. ‘नासा’ने मे आणि जून महिन्यात ही प्रक्रिया प्रत्यक्षात आणण्यापूर्वी ‘व्हॉयेजर २’वर अनेक सुरक्षित चाचण्या घेतल्या.

४ ऑगस्टच्या निवेदनात या चाचण्यांचे सकारात्मक निकाल जाहीर करताना ‘नासा’ने सांगितले की, ऊर्जेचे हे हस्तांतरण पूर्णपणे यशस्वी झाले आहे. या यशस्वी प्रयोगामुळे मिळालेल्या ऊर्जेच्या बचतीमुळे ‘व्हॉयेजर २’ची तीनही प्रमुख वैज्ञानिक उपकरणे किमान आणखी एक वर्ष विनाअडथळा कार्यरत राहू शकतील, असा विश्वास ‘नासा’ने व्यक्त केला आहे. ‘व्हॉयेजर २’वरील या यशानंतर आता शास्त्रज्ञांचे लक्ष ‘व्हॉयेजर १’ यानाला दीर्घायुष्य देण्यासाठी मोहीम आखण्याकडे लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news