‘नासा’ने 50 वर्षांपूर्वीच्या ‘व्होएजर 1’चे थ्रस्टर्स पुन्हा केले कार्यरत!

या यशामुळे ‘व्होएजर 1’ ला आता अधिक काळ कार्यरत ठेवता येणार
nasa-reactivates-voyager-1-thrusters-after-50-years
‘नासा’ने 50 वर्षांपूर्वीच्या ‘व्होएजर 1’चे थ्रस्टर्स पुन्हा केले कार्यरत!Pudhari File Photo
Published on
Updated on

वॉशिंग्टन : ‘नासा’च्या अभियंत्यांनी 20 वर्षांपूर्वी बंद पडलेले ‘व्होएजर 1’ अंतराळयानाचे जुने थ्रस्टर्स पुन्हा सुरू करून एक चमत्कार साध्य केला आहे. ही दुरुस्ती वेळेत झाली नसती, तर यानाचा पृथ्वीसोबतचा संपर्क कायमचा तुटण्याचा धोका निर्माण झाला होता. या यशामुळे ‘व्होएजर 1’ ला आता अधिक काळ कार्यरत ठेवता येणार असून, पुढील वर्षी होणार्‍या नियोजित संवाद पुनर्स्थापनेसाठी मोलाची वेळ मिळाली आहे.

1977 साली प्रक्षेपित झालेलं ‘व्होएजर 1’ आज पृथ्वीपासून तब्बल 15 अब्ज मैल (24 अब्ज किमी) दूर आहे. यामुळे या यानापर्यंत पोहोचणार्‍या आणि परत येणार्‍या रेडिओ सिग्नलला एकूण 46 तास लागतात. ‘व्होएजर 1’ सध्या आपल्या सौरमालेच्या बाहेर, म्हणजे अंतरतारकीय अंतराळात कार्यरत आहे आणि सूर्याच्या चुंबकीय प्रभाव क्षेत्राबाहील स्थिती नोंदवत आहे. 2004 मध्ये ‘व्होएजर 1’ चे दोन हीटर सर्किटस् बंद पडल्यानंतर त्याच्या बॅकअप थ्रस्टर्स वापरण्यात आले. हे थ्रस्टर्स यानाची दिशा एका संदर्भ तार्याकडे स्थिर ठेवण्यासाठी गरजेचे आहेत, जेणेकरून पृथ्वीशी संपर्क टिकवता येतो. परंतु दीर्घकाळ वापरामुळे बॅकअप थ्रस्टर्स आता प्रोपेलंट अवशेषांमुळे बंद पडण्याच्या स्थितीत आले होते.

‘नासा’च्या अभियंत्यांनी एक साहसी आणि अत्यंत धोकादायक निर्णय घेतला, त्यांनी यानाचे मूळ थ्रस्टर्स पुन्हा सुरू करण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी त्यांनी गृहीत धरले की बंद पडलेले हीटर सर्किट केवळ चुकीच्या स्विचमुळे निष्क्रिय झाले असावेत. योग्य स्विच पुन्हा सुरू केल्यास ते काम करु लागतील. पण हे काम सोपं नव्हतं, चुकीच्या वेळी थ्रस्टर्स सुरू झाले असते आणि हिटर बंद असते, तर यानाचा कोर्स बदलून तोटा किंवा विस्फोट होण्याचा धोका होता. या सार्‍या प्रयत्नांवर एक आणखी घाईचा दबाव होता.

कारण ‘डीप स्पेस स्टेशन 43’ जे ‘व्होएजर 1’ ला सिग्नल पाठवण्यास सक्षम असलेले एकमेव अँटेना, मे 4 पासून फेब्रुवारी 2026 पर्यंत अपग्रेडसाठी बंद होत आहे. केवळ ऑगस्ट आणि डिसेंबरमध्ये हे स्टेशन तात्पुरते पुन्हा कार्यरत होणार आहे. त्यामुळे नासाला मार्चमध्येच ही चाचणी करणे आवश्यक होते. 20 मार्च रोजी इंजिनिअर्सनी ‘व्होएजर 1’ कडे सिग्नल पाठवला आणि 46 तासांनंतर उत्तर आलं. प्राप्त झालेल्या डेटामधून स्पष्ट झालं की थ्रस्टर्सचे हिटर गरम होत होते, म्हणजेच, प्रयोग यशस्वी झाला होता!

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news