अलास्कामधील तेजस्वी ऑरोरामध्ये नासाचे दोन रॉकेटस् प्रक्षेपित

nasa-launches-two-rockets-in-bright-alaska-aurora
अलास्कामधील तेजस्वी ऑरोरामध्ये नासाचे दोन रॉकेटस् प्रक्षेपितPudhari File Photo
Published on
Updated on

वॉशिंग्टन : गेल्या आठवड्यात नासाने अलास्काच्या आकाशात उमटणार्‍या तेजस्वी ऑरोरामध्ये दोन रॉकेटस् प्रक्षेपित करून पृथ्वीच्या वायुमंडळावर त्यांच्या परिणामांचा अभ्यास केला. हा प्रयोग अत्यंत नेत्रसुखद प्रकाशप्रदर्शनासोबतच वैज्ञानिक द़ृष्टिकोनातूनही महत्त्वाचा ठरला.

या प्रयोगाचे नाव आहे ‘ऑरोरल वेव्ज एक्साईटेड बाय सबस्टॉर्म ऑनसेट मॅग्नेटिक इव्हेंटस्’ किंवा संक्षेपात अथएडजचए (अ‍ॅवसम!) हा उपक्रम युनिव्हर्सिटी ऑफ अलास्का फेअरबँक्स (यूएएफ) येथील संशोधकांच्या नेतृत्वाखाली राबवला जात आहे. या प्रकल्पांतर्गत तीन साउंडिंग रॉकेटस् प्रक्षेपित करण्याची योजना होती, त्यापैकी दोन रॉकेटस् 25 मार्च रोजी पहाटे पोकर फ्लॅट रिसर्च रेंज, फेअरबँक्सच्या उत्तरेला, यावरून यशस्वीरीत्या सोडण्यात आले. रॉकेटस्नी उंच आकाशात ऑरोरामधून जाताना वापर ट्रेसर गॅसचे फवारे सोडले, ज्यामुळे उत्तर अलास्काच्या आकाशात रंगीबेरंगी प्रकाश रेषा उमटल्या. या ट्रेसर गॅसच्या हालचाली जमिनीवरून टिपल्या जातात आणि त्यांच्या आधारे वरच्या वायुमंडळातील वारे आणि विद्युत भारित कणांच्या प्रवाहांचे मोजमाप केले जाते, अशी माहिती नासाने दिली. प्रमुख संशोधक मार्क कॉन्डे, जे ‘यूएएफ’च्या ‘जिओफिजिकल इन्स्टिट्यूट’मध्ये स्पेस फिजिक्सचे प्राध्यापक आहेत, त्यांनी सांगितले, ‘आम्हाला हवामानाची योग्य स्थिती मिळाल्याने प्रयोग राबवणे शक्य झाले. मी अत्यंत आनंदी आहे.’ या प्रयोगासाठी वापरण्यात आलेल्या दोन रॉकेटस्मध्ये एक होते 42 फूट लांबीचे ‘टेरियर-इम्प्रुव्हड मॅलेम्यूट’ रॉकेट आणि दुसरे 70 फूट लांबीचे, चार स्टेजचे ‘ब्लॅक ब्रँट 12’ रॉकेट. या रॉकेटस्नी एकाच वेळी विविध उंचीवर वापर ट्रेसर आणि दाब मापक यंत्रे सोडली. हे सर्व सडन ऑरोरल सबस्टॉर्म दरम्यान घडले, ही अशी घटना असते जिथे ऑरोरा अचानक तीव्रतेने उजळते आणि ती काही काळासाठी स्फोटक स्वरूप धारण करते. मॅलेम्यूट रॉकेटने ऑरोरामुळे निर्माण होणार्‍या चुंबकीय बदलांचाही अभ्यास केला. या प्रयोगामुळे पृथ्वीच्या आयनमंडळातील आणि वरच्या वायुमंडळातील प्रक्रियांबाबत अधिक सखोल माहिती मिळेल, जी भविष्यातील अंतराळ विज्ञान आणि हवामान अभ्यासासाठी उपयुक्त ठरेल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news