Artemis 2 helium leak | ‘नासा’कडून ‘आर्टेमिस-2’मधील हेलियम गळतीची समस्या दूर

एप्रिलमध्ये प्रक्षेपणाची तयारी
Artemis 2 helium leak |
Artemis 2 helium leak | ‘नासा’कडून ‘आर्टेमिस-2’मधील हेलियम गळतीची समस्या दूरGREGG NEWTON
Published on
Updated on

वॉशिंग्टन : अमेरिकन अंतराळ संस्था ‘नासा’ने त्यांच्या ‘आर्टेमिस-2’ रॉकेटमधील हेलियम प्रवाहाची तांत्रिक अडचण यशस्वीरीत्या सोडवली असल्याचे जाहीर केले आहे. या दुरुस्तीमुळे आता पुढील काही आठवड्यांत हे ऐतिहासिक मिशन चंद्राच्या दिशेने झेपावण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

गेल्या महिन्यात ‘स्पेस लॉन्च सिस्टम’ (डङड) रॉकेटच्या वरच्या भागात हेलियमच्या प्रवाहात अडथळा येत असल्याचे निदर्शनास आले होते. नासाच्या अभियंत्यांनी सखोल तपासणीअंती असे सांगितले की, एका सीलने आपली जागा सोडल्यामुळे हा अडथळा निर्माण झाला होता. आता हे सील दुरुस्त करण्यात आले असून रॉकेट पुन्हा सज्ज झाले आहे. ‘नासा’ आता एप्रिल महिन्यात हे प्रक्षेपण करण्याचे लक्ष्य ठेवून आहे. फ्लोरिडातील केनेडी स्पेस सेंटरमधून या मोहिमेसाठी खालील तारखा निश्चित करण्यात आल्या आहेत :

पहिली संधी : 1 एप्रिल, दुसरी संधी : 3 ते 6 एप्रिल दरम्यान, शेवटची संधी : 30 एप्रिल. 30 एप्रिल ही या मोहिमेसाठी अंतिम मुदत आहे. त्यापूर्वी रॉकेटच्या ‘सेल्फ-डिस्ट्रक्ट सिस्टीम’मधील बॅटरी बदलणे यांसारखी इतर तांत्रिक कामे पूर्ण केली जातील. आर्टेमिस मोहिमेला यापूर्वी अनेकदा हायड्रोजन गळती आणि तांत्रिक कारणांमुळे विलंब झाला आहे. फेब्रुवारीच्या अखेरीस नासाने या कार्यक्रमात मोठे बदल जाहीर केले असून, आता वर्षाला एक प्रक्षेपण करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. 19 फेब्रुवारी रोजी झालेल्या इंधन भरण्याच्या यशस्वी चाचणीमुळे शास्त्रज्ञांचा आत्मविश्वास वाढला असून, एप्रिलमधील प्रक्षेपणाकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

मोहिमेचे ऐतिहासिक महत्त्व

50 वर्षांहून अधिक काळानंतर मानव पुन्हा एकदा चंद्राच्या दिशेने प्रवास करणार आहे. या मोहिमेची काही खास वैशिष्ट्ये अशी आहेत: ऐतिहासिक चमू : पहिल्यांदाच एक महिला आणि एका कृष्णवर्णीय अंतराळवीराचा चंद्रावर जाणार्‍या संघात समावेश असेल. 10 दिवसांचा प्रवास : हे अंतराळवीर चंद्रावर उतरणार नाहीत; मात्र चंद्राभोवती प्रदक्षिणा घालून आतापर्यंतच्या सर्वाधिक अंतरावर जाऊन सुरक्षित परततील. भविष्यातील तयारी : 2028 मध्ये होणार्‍या ‘लुनार लँडिंग’ (चंद्रावर उतरणे) मोहिमेपूर्वी सिस्टीमची चाचणी घेणे हा या 10 दिवसांच्या प्रवासाचा मुख्य उद्देश आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news