‘नासा’ने शोधला ‘मौल्यवान’ लघुग्रह | पुढारी

Published on
Updated on

वॉशिंग्टन : लघुग्रहांबाबत सातत्याने नवे संशोधन होत असते. 'बेन्‍नू' नावाच्या लघुग्रहावर तर अंतराळयान उतरवण्याची तयारीही 'नासा'ने केली आहे. दरम्यान, 'नासा'ने खनिजांनी संपन्‍न असलेल्या एका लघुग्रहाचा शोध लावलेला आहे. '16 साईक' नावाच्या या लघुग्रहाचा अभ्यास करण्यासाठीही आता अंतराळयान पाठवले जाणार आहे. 

मंगळ आणि गुरू या ग्रहांदरम्यान लघुग्रहांचा एक पट्टा आहे. 'अ‍ॅस्टॉरॉईड बेल्ट' म्हणूनच ओळखल्या जाणार्‍या या पट्ट्यात हा '16 साईक' नावाचा लघुग्रह आहे. तो या पट्ट्यातील सर्वात मोठ्या लघुग्रहांपैकी एक आहे. त्याचे वैशिष्ट्य म्हणजे त्यावर पूर्णपणे शुद्ध असे धातू आहेत. हा 226 किलोमीटर लांबीचा लघुग्रह आहे. हा आकार आपल्या चंद्राच्या व्यासाच्या सोळाव्या भागाइतका आहे. या लघुग्रहावर अब्जावधी डॉलर्स किमतीचे मौल्यवान धातू असू शकतात. केवळ लोखंडच दहा अब्ज डॉलर्सचे असू शकते असा अंदाज लिन्डे एककिन्स-टॅटोन या संशोधकाने वर्तवलेला आहे. तेथील धातूची विक्री केल्यास जगातील प्रत्येक मनुष्य श्रीमंत होऊ शकतो. या लघुग्रहाचा अभ्यास करण्यासाठी 'साईक' नावाचेच अंतराळयान पाठवले जाणार आहे. ते ऑगस्ट 2022 मध्ये लाँच होईल आणि 2026 च्या सुरुवातीला या लघुग्रहावर जाईल. या यानामध्ये मल्टिस्पेक्ट्रल इमेजर, गामा रे आणि न्यूरॉन स्पेक्ट्रोमीटर, एक रेडिओ साधन आणि एक मॅग्‍नेटोमीटर असेल.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news