NASA Artemis 2 mission | नासाचे ‘आर्टेमिस 2’ चंद्राकडे झेपावण्यासाठी सज्ज

रॉकेट पुन्हा लाँचपॅडवर दाखल
NASA Artemis 2 mission |
NASA Artemis 2 mission | नासाचे ‘आर्टेमिस 2’ चंद्राकडे झेपावण्यासाठी सज्ज
Published on
Updated on

वॉशिंग्टन ः चंद्रावर मानवाचे पुनरागमन घडवून आणणार्‍या नासाच्या महत्त्वाकांक्षी ‘आर्टेमिस 2’ मोहिमेने आता वेग घेतला आहे. एप्रिल महिन्याची अंतिम मुदत संपण्यापूर्वी प्रक्षेपण करण्याच्या तयारीसाठी नासाचे महाकाय रॉकेट पुन्हा एकदा लाँचपॅडच्या दिशेने रवाना झाले आहे.

322 फूट (98 मीटर) उंच ‘स्पेस लॉन्च सिस्टम’ (SLS) आणि ‘ओरियन कॅप्सूल’ यावर्षी दुसर्‍यांदा लाँचपॅडवर नेण्यात येत आहे. यापूर्वी 17 जानेवारी रोजी हे रॉकेट बाहेर काढण्यात आले होते. मात्र, दोन ‘वेट ड्रेस रिहर्सल’ (प्रक्षेपणाचा सराव) दरम्यान हायड्रोजन गळती आढळल्याने, दुरुस्तीसाठी ते पुन्हा ‘व्हेईकल असेंब्ली बिल्डिंग’मध्ये (VAB) नेण्यात आले होते. आता सर्व तांत्रिक दोष दूर करून रॉकेट पुन्हा सज्ज झाले आहे. या रॉकेटचे वजन 11 दशलक्ष पौंड (सुमारे 50 लाख किलो) आहे.

फ्लोरिडातील केनेडी स्पेस सेंटरमधील VAB ते लाँचपॅड 39 B पर्यंतचे 6.4 कि.मी. अंतर आहे. सोसाट्याच्या वार्‍यामुळे या प्रवासाला काही तास उशीर झाला असून, पूर्ण प्रवासासाठी साधारण 12 तास लागतील. जर सर्व चाचण्या यशस्वी झाल्या, तर 1 एप्रिल रोजी हे रॉकेट अवकाशात झेपावू शकते. नासाने 1 ते 6 एप्रिल आणि 30 एप्रिल या तारखा प्रक्षेपणासाठी खुल्या ठेवल्या आहेत. या 10 दिवसांच्या मोहिमेत चार अंतराळवीर चंद्राला प्रदक्षिणा घालून पृथ्वीवर परततील.

हे अंतराळवीर सध्या ‘क्वारंटाईन’ (विलगीकरण) मध्ये आहेत. नासाने आर्टेमिस 2 मोहिमेसाठी एप्रिल 2026 ही अंतिम मुदत निश्चित केली आहे. यापूर्वी 2022 मध्ये ‘आर्टेमिस 1’ मोहिमेवेळीही अशाच तांत्रिक अडचणी आल्या होत्या. सततच्या विलंबामुळे नासाने आता आपल्या कार्यक्रमात मोठे बदल केले असून, 2028 पर्यंत चंद्रावर दोनदा मानवी लँडिंग करण्याचे ध्येय ठेवले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news