पेशींची हानी रोखण्यासाठी नॅनोवायर्सचा वापर शक्य

आता आरोग्याच्या क्षेत्रातही नॅनो टेक्नॉलॉजी वापर करता येणार
Nanowires may be used to prevent cell damage
वैद्यकीय क्षेत्रामध्ये ही आता नॅनोवायर्सचा वापर होणारPudhari Photo
Published on
Updated on

बंगळूर ः सध्याचा जमाना आर्टिफिशियल इंटेलिजन्स, रोबो, थ्रीडी प्रिंटिंग आणि नॅनो टेक्नॉलॉजीचा आहे. आरोग्याच्या क्षेत्रातही नॅनो टेक्नॉलॉजी वापरता येऊ शकते हे भारतातीलच वैज्ञानिकांनी दाखवले आहे. व्हॅनाडियापासून तयार केलेल्या नॅनोवायर्स या मानवी शरीरातील पेशींची हानी रोखतात असे बंगळुरू येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सेस येथील वैज्ञानिकांनी केलेल्या संशोधनात स्पष्ट झालेले आहे. त्यामुळे वार्धक्यामुळे होणार्‍या रोगांवर नवीन उपचार शक्य होऊ शकतात.

Nanowires may be used to prevent cell damage
फूड टेक्नॉलॉजी; एक उत्तम करिअर

हृदयरोग, कंपवात व स्मृतिभ्रंश यांसारखे वार्धक्याबरोबर होणारे रोग यावर नवीन औषधे तयार करणे त्यामुळे शक्य होईल. व्हॅनेडियम ऑक्साईड किंवा व्हॅनाडिया हे व्हॅनाडियमचे एक रूप असून ते आवर्तीसारणीत टिटॅनियमच्या जवळ सापडते. पेशींच्या चयापचय क्रियेत रिअ‍ॅक्टिव्ह ऑक्सिजन स्पेसीज (आरओएस)ची निर्मिती होते व त्यात वाढ झाल्यास पेशींची नेहमीची रिडॉक्स अवस्था विस्कळीत होते त्यामुळे पेशीतील प्रथिने, मेदाम्ले व डीएनए या घटकांना हानी पोहोचते. आरओएसमुळे ऑक्सिडेटिव्ह ताण निर्माण होऊन आपल्याला अनेक रोग होतात, त्यात कर्करोग, संधिवात, मूत्रपिंडाचे विकार यांचा समावेश आहे.

आरओएसवर नियंत्रण ठेवण्यासाठी वापरली जाणारी अनेक औषधे ही कमी प्रमाणात आरओएसची उलट निर्मिती करतात, त्यामुळे नैसर्गिक निर्विषीकरण मार्गाची नक्कल करण्याचा आमचा विचार आहे, असे संशोधन पथकाचे प्रमुख जी. मुगेश व पॅट्रिक डिसिल्व्हा यांनी म्हटले होते. ‘नेचर कम्युनिकेशन्स’ या नियतकालिकात प्रसिद्ध झालेल्या संशोधनानुसार व्हॅनाडिया नॅनोवायर्स या नसश्गक अँटी ऑक्सिडंटची नक्कल करतात. आरओएस हे एका विशिष्ट मात्रेत असेल तर उपकारक असते.

स्टरलाईट टेक्नॉलॉजी | पुढारी

अनेक जैव रासायनिक क्रियात ते दुय्यम संदेशवाहकाचे काम करते व शरीरातील चयापचय क्रिया सुरळीत राहण्यासाठी त्याचा उपयोग असतो. मानवी शरीरात जास्त झालेले आरओएस बाहेर काढण्यासाठी काही यंत्रणा असतात, त्यात हायड्रोजन पेरॉक्साईडचा समावेश आहे. जेव्हा आपल्याला एखादा रोग होतो तेव्हा आरओएसचे प्रमाण वाढते व त्यात नैसर्गिक निचरा होण्याची प्रक्रिया टिकाव धरत नाही, पण आपण कृत्रिम पद्धतीने आरओएसचे नियंत्रण करू शकतो, असे डिसिल्व्हा यांनी म्हटले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news