हिमालयात दिसलेल्या रहस्यमयी लाल स्तंभांचे गूढ उकलले

अ‍ॅस्ट्रोफोटोग्राफर एंजेल आणि शुचांग डोंग यांनी या स्तंभांचे फोटो काढले होते
mystery-of-red-pillars-seen-in-himalayas-solved
हिमालयात दिसलेल्या रहस्यमयी लाल स्तंभांचे गूढ उकललेPudhari File Photo
Published on
Updated on

नवी दिल्ली : सुमारे तीन वर्षांपूर्वी हिमालयाच्या विशाल आकाशात दिसलेल्या रहस्यमयी लाल रंगाच्या प्रकाशाच्या स्तंभांनी सर्वांनाच आश्चर्यचकित केले होते. चीनमधील दोन अ‍ॅस्ट्रोफोटोग्राफर एंजेल आणि शुचांग डोंग यांनी या स्तंभांचे फोटो काढले होते. आता शास्त्रज्ञांनी या अद्भुत घटनेमागील वैज्ञानिक रहस्य उलगडले असून, हे निसर्गाचे एक दुर्मीळ आणि सुंदर रूप असल्याचे स्पष्ट केले आहे.

चिनी शास्त्रज्ञांच्या अभ्यासानुसार, 2022 मध्ये दक्षिण तिबेटी पठाराजवळ दिसलेली ही घटना ‘रेड स्प्राइट्स’ (Red Sprites) नावाचे एक दुर्मीळ वातावरणीय वीज उत्सर्जन होते. सामान्य विजा वादळी ढगांच्या खालच्या दिशेने जमिनीवर येतात, याउलट रेड स्प्राइट्स ढगांच्या सुमारे 80 किलोमीटर वरच्या वातावरणात तयार होतात. त्यांचा आकार जेलीफिशसारखा दिसतो आणि ते फक्त काही मिलिसेकंदांसाठीच टिकतात, ज्यामुळे त्यांना पाहणे अत्यंत कठीण असते.

हे स्प्राइट्स जमिनीवर होणार्‍या अत्यंत शक्तिशाली विजांच्या झटक्यांशी जोडलेले असतात, जे वातावरणाच्या वरच्या थरात विद्युत ऊर्जा पाठवतात. हिमालयासारख्या उंच आणि दुर्गम ठिकाणी अशा घटनांचे निरीक्षण करणे अत्यंत दुर्मीळ मानले जाते. या शोधामुळे शास्त्रज्ञांना पृथ्वीचे हवामान आणि अवकाशाची सुरुवात यांच्यातील गुंतागुंतीच्या विद्युत संबंधांना अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यास मदत मिळत आहे. निसर्गाच्या या अद्भुत चमत्काराने वातावरणीय विज्ञानातील संशोधनाला एक नवी दिशा दिली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news