ऑस्ट्रेलियातील गूढ वर्तुळांचे उलगडले रहस्य

mystery of mysterious circles in Australia revealed
ऑस्ट्रेलियातील गूढ वर्तुळांचे उलगडले रहस्य Pudhari File Photo
Published on
Updated on

कॅनबेरा : ऑस्ट्रेलियात मेलबोर्न शहराजवळ जमिनीवर शेकडो वर्षांपूर्वीची अनेक भव्य वर्तुळे पाहायला मिळतात. तेथील टेकड्यांवरील या गूढ वर्तुळांना ‘अर्थ रिंग्ज’ म्हणून ओळखले जाते. सनबरीचे एक उपनगर असलेल्या वुरुंडजेरी वोई-वुरुंग कंट्रीमध्ये ही वर्तुळे आहेत. ही वर्तुळे नैसर्गिकरित्या तयार झालेली नसून मानवनिर्मित आहेत. आता या वर्तुळांचे रहस्य उलगडण्यात यश आले आहे.

‘ऑस्ट्रेलियन आर्कियोलॉजी’मध्ये याबाबतच्या नव्या संशोधनाची माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे. या वर्तुळांपैकी एका वर्तुळामध्ये वैज्ञानिक उत्खनन करून हे संशोधन करण्यात आले. अशा अर्थ रिंग्ज केवळ ऑस्ट्रेलियातच आहेत असे नाही. इंग्लंड, अ‍ॅमॅझोनिया आणि कंबोडियासारख्या अनेक ठिकाणी त्या आढळतात. शेकडो वर्षांपूर्वीच्या लोकांनी या भव्य वर्तुळांची रचना केली होती. त्यांनी जमिनीत उत्खनन करून किंवा ढिगारे रचून शेकडो मीटर व्यासाची ही वर्तुळे बनवली होती. ऑस्ट्रेलियातही आदिवासी लोकांनी अशाच वर्तुळांची निर्मिती केली. हे ठिकाण ऑस्ट्रेलियात एक गुप्त आणि पवित्र ठिकाण म्हणून ओळखले जाते. युरोपियन वसाहतवादाच्या काळात यापैकी अनेक वर्तुळे नष्ट झाली व तेथील जमीन विविध कारणांसाठी वापरण्यात आली. असे म्हटले जाते की, न्यू साऊथ वेल्स आणि क्वीन्सलँडच्या परिसरातच एकेकाळी हजारो अर्थ रिंग्ज अस्तित्वात होत्या. सध्या त्यापैकी सुमारे शंभर अर्थ रिंग्ज शिल्लक आहेत. व्हिक्टोरियामध्ये त्यापैकी काही वर्तुळे असून, सनबरीमध्ये पाच अर्थ रिंग्ज आहेत. आता ‘सनबरी रिंग जी’ या नावाने ओळखल्या जाणार्‍या वर्तुळात उत्खनन करण्यात आले. याठिकाणी प्राचीन काळातील लोक एकत्र येऊन काही धार्मिक विधी करीत तसेच उत्सव साजरे करीत होते असे आढळून आले. तिथे काही दगडी अवजारे व कलाकृतीही मिळाल्या आहेत. हे वर्तुळ 590 ते 1400 वर्षांपूर्वीच्या काळातील असल्याचे अनुमान आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news