‘या’ विहिरीत गेलेला कधीच परतला नाही!

काय आहे या विहिरीचे रहस्य?
mysterious well
‘या’ विहिरीत गेलेला कधीच परतला नाही!
Published on
Updated on

पॅरिस ः अनेक ठिकाणी असे काही वेगवेगळे रहस्य असतात की, आपल्यालादेखील कळत नाही. अनेक ठिकाणी पाणी कुठू येते हेच कळत नाही, तर कुठे निसर्गाची किमया बघायला मिळते. तर काही ठिकाणी इतके नितळ पाणी दिसते की बघून तुम्हालादेखील आश्चर्य वाटेल. आज आम्ही तुम्हाला अशाच एका विहिरीबद्दल माहिती सांगणार आहोत. ही विहीर इतकी घातक आहे की, एकदा या विहिरीत गेलेला माणूस पुन्हा परतत नाही. हो. हे सत्य असून, या विहिरीचे रहस्य अजूनही उलगडले नाही. चला तर मग याविषयी जाणून घेऊया.

फ्रान्समधील टोनेरी या गावात एक गूढ विहीर आहे. ही विहीर शतकानुशतके सातत्याने पाण्याने भरलेली आहे. या विहिरीचे नाव फॉसे डायन आहे, ज्याचा अर्थ फ्रेंचमध्ये ‘पवित्र खड्डा’ असा होतो. लोक त्याला पवित्र मानण्याचेदेखील एक कारण आहे. ही प्राचीन विहीर गेली अनेक शतके गूढ आणि आकर्षणाचे केंद्र राहिली आहे. असे म्हटले जाते की, धबधब्यातून सतत पाणी वाहत असे. अठराव्या शतकात फ्रेंचांनी त्याभोवती भिंत उभी करून त्याला विहिरीचे स्वरूप दिले. मात्र, शतकानुशतके या विहिरीखाली काय आहे, याबाबत लोकांच्या मनात कुतूहल आहे. आख्यायिका म्हणतात की, हे दुसर्‍या जगाचे प्रवेशद्वार असू शकते किंवा त्याच्या आत लपलेला एक भयानक प्राणी असू शकतो. 1908 मध्ये पहिल्यांदा त्यात डुबकी मारण्याचा प्रयत्न झाला होता; पण त्यावेळी उपकरणांच्या कमतरतेमुळे पाणबुडे जास्त खोलात जाऊ शकले नाहीत, असे म्हटले जाते. 1955 आणि 1962 मधील प्रयत्नही अयशस्वी ठरले. 1963 मध्ये आणखी एका पथकाने खोलवर उतरण्याचा प्रयत्न केला; पण दोन जणांचा मृत्यू झाला. त्यानंतर 1974 मध्ये दोन प्रोफेशनल डायव्हर्स आत गेले आणि परत आलेच नाहीत. त्यांचे मृतदेह सापडले नाहीत. 1996 मध्ये आणखी एकाच्या मृत्यूनंतर या गूढ विहिरीत डायव्हिंगवर 20 वर्षांची बंदी घालण्यात आली होती. 2019 मध्ये प्रथमच पियरे-एरिक डेझॅन या अनुभवी डायव्हरने विहिरीच्या आत 370 मीटरचे अंतर पार केले. परंतु तो देखील या धबधब्याच्या उगमस्थानापर्यंत पोहोचू शकला नाही. ‘फॉसे डायन’च्या जलस्त्रोताचे गूढ अद्याप सुटलेले नाही. त्याचे भूमिगत भुलभुलय्यासारखे बोगदे, ज्यात अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत, आजही नकाशावर अपूर्ण आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news