Sailing Stones Mystery | रहस्यमय दगड जे स्वतःहून चालतात; अमेरिकेतील डेथ व्हॅलीचे गूढ उकलले

Sailing Stones Mystery | अमेरिकेतील डेथ व्हॅली वाळवंटात शेकडो किलो वजनाचे दगड स्वतःहून कसे चालतात, याविषयीचे वैज्ञानिक रहस्य आणि त्याचे अचूक कारण जाणून घ्या.
Sailing Stones Mystery | डेथ व्हॅलीतील ‘चालणार्‍या’ दगडांचे काय आहे रहस्य?
Sailing Stones Mystery | डेथ व्हॅलीतील ‘चालणार्‍या’ दगडांचे काय आहे रहस्य?Pudhari File Photo
Published on: 
Updated on: 

वाशिंग्टन (पुढारी वृत्तसेवा): अमेरिकेतील 'डेथ व्हॅली नॅशनल पार्क' हे जगातील सर्वात उष्ण आणि कोरड्या ठिकाणांपैकी एक म्हणून ओळखले जाते. या वाळवंटात अनेक अनाकलनीय गोष्टी दडलेल्या आहेत, पैकी सर्वात मोठे आणि दशकांपासून संशोधकांना कोड्यात टाकणारे रहस्य म्हणजे 'चालणारे दगड' (Sailing Stones). येथे शेकडो पाषाण किंवा खडक मानवी हस्तक्षेपाशिवाय वाळवंटात स्वतःहून शेकडो फुटांचे अंतर कापतात आणि मागे आपल्या चालण्याचे मार्ग (खुणा) सोडून जातात.

Sailing Stones Mystery | डेथ व्हॅलीतील ‘चालणार्‍या’ दगडांचे काय आहे रहस्य?
आठ लाखांचे महागडे बूट केले दान

डेथ व्हॅलीच्या 'रेट्रॅक प्लाया' नावाच्या सपाट आणि कोरड्या दलदलीच्या भागात ही अद्भूत घटना घडते. येथे पांढऱ्या मातीवर किंवा चिखलावर लहान दगडापासून ते शेकडो किलो वजनाचे अजस्त्र खडक स्वतःहून सरकल्याचे स्पष्टपणे दिसून येते. या दगडांनी मागे सोडलेले रेषांसारखे मार्ग त्यांच्या प्रवासाची साक्ष देतात.

काही दगड सरळ रेसूत चालतात, तर काही जण वळण घेऊन किंवा एकमेकांना ओलांडून पुढे जातात. हे दगड नेमके कसे चालतात, याविषयी १९०० च्या दशकापासून संशोधकांमध्ये आणि भूशास्त्रज्ञांमध्ये प्रचंड उत्सुकता होती. सुरुवातीला काही जणांना भूकंपाचे धक्के, रात्री वाहणारे वादळी वारे किंवा चुंबकत्वाचा प्रभाव यामागे असावा असे वाटले.

मात्र, काही दगड इतके प्रचंड जड होते की केवळ वाऱ्याच्या झोताने ते हलणे अशक्य होते. २०१४ मध्ये वैज्ञानिकांच्या एका पथकाने (स्क्रिप्स इन्स्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफी) या रहस्याचा अचूक उलगडा केला.

त्यांनी काही खडकांवर जीपीएस ट्रॅकर बसवून त्यांच्या हालचालींचा अभ्यास केला. संशोधनात असे समोर आले, की हा चमत्कार वाऱ्याचा वेग आणि बर्फाच्या एका विशिष्ट थराचा संयुक्त खेळ आहे. हिवाळ्यात डेथ व्हॅलीमध्ये कधीकधी पाऊस पडतो आणि रात्री तापमान गोठवणाऱ्या थंडीमुळे त्या उथळ पाण्याचे पातळ बर्फात रूपांतर होते.

Sailing Stones Mystery | डेथ व्हॅलीतील ‘चालणार्‍या’ दगडांचे काय आहे रहस्य?
Scientific research | नद्यांना जिवंत ठेवण्यासाठी वरदान ठरतात पाणघोडे

पहाटेच्या सुमारास जेव्हा कडक ऊन पडू लागते, तेव्हा हा बर्फ मोठ्या पातळ चादरींच्या स्वरूपात तुटू लागतो. या बर्फाच्या तुकड्यांवर जेव्हा वाळवंटात जोरदार वारे वाहतात, तेव्हा ते एका मोठ्या पालखीसारखे काम करतात. या बर्फाच्या मदतीने जड दगड पाण्यावर आणि चिखलावर हलकेपणाने सरकू लागतात.

दिवसा सूर्यप्रकाशामुळे हा बर्फ पूर्णपणे विरघळून नष्ट होतो आणि वाळवंट पुन्हा कोरडे पडते. मात्र, दगड मात्र आपली जागा बदलून दूरवर पोहोचलेले असतात. निसर्गाच्या या अद्भूत आणि विस्मयकारक घटनेमुळे 'डेथ व्हॅली'मधील हे चालणारे दगड आजही जगभरातील पर्यटक आणि विज्ञानप्रेमींसाठी मोठे कुतूहलाचे केंद्र ठरले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.