Mysterious Village Russia | चित्रविचित्र आवाज येणारे रशियामधील गूढ गाव

आजही विज्ञानासाठी एक मोठे रहस्य
mysterious-russian-village-with-strange-sounds
चित्रविचित्र आवाज येणारे रशियामधील गूढ गावPudhari File Photo
Published on
Updated on

मॉस्को : रशियामध्ये एक असे गाव आहे, जे आजही विज्ञानासाठी एक मोठे रहस्य बनलेले आहे. उरल पर्वतांच्या जवळ असलेले मोल्योब्का नावाचे हे गाव ‘एम-ट्रायंगल’ किंवा ‘पर्म झोन’ म्हणून प्रसिद्ध आहे. हा परिसर सुमारे 70 वर्ग मैल क्षेत्रात पसरलेला असून, मॉस्कोपासून सुमारे 600 मैल दूर आहे. 1980 च्या दशकात जेव्हा या परिसरातून विचित्र आवाज ऐकू येऊ लागले, तेव्हापासून शास्त्रज्ञ आणि रहस्यप्रेमींचे लक्ष या गावाकडे वेधले गेले. लोकांनी सांगितले की, येथे कोणत्याही वाहनाशिवाय रहदारीचा आवाज ऐकू येतो. विशेष म्हणजे येथून जवळचा रस्ता 40 किलोमीटर दूर आहे; पण ही तर फक्त सुरुवात होती. त्यानंतर अनेक घटना या गावात घडत गेल्या आहेत.

एम-ट्रायंगलमध्ये अशा घटना घडतात, ज्या सामान्यतः विज्ञानाच्या पलीकडच्या आहेत. कधी ढगांमधून एक तेजस्वी प्रकाशाची किरण पृथ्वीवर येते, तर कधी घनदाट जंगलात पारदर्शक आकृत्या फिरताना दिसतात. काही लोकांनी तर येथे यूएफओ पाहिल्याचा दावाही केला आहे. या रहस्यमय जागेबद्दल सर्वात धक्कादायक दावा हा आहे की, जो व्यक्ती मंदबुद्धीचा असतो, तो येथे काही दिवस राहिल्यास हुशार बनतो. एवढेच नाही, तर गंभीर आजारी लोक येथे येऊन आपोआप बरे होतात. लोकांना असे वाटते की, येथे कोणतीतरी अद़ृश्य शक्ती अस्तित्वात आहे.

सर्वात मनोरंजक गोष्ट म्हणजे येथे ‘कॉल बॉक्स हिल’ आहे. एम-ट्रायंगलमध्ये मोबाईल नेटवर्क कंपन्या असल्या, तरी फोन काम करत नाहीत. परंतु, जसे तुम्ही एका विशिष्ट मातीच्या ढिगार्‍यावर चढता, तसे तुम्ही जगाच्या कोणत्याही कोपर्‍यात कॉल करू शकता; पण ढिगार्‍यावरून खाली उतरताच कॉल आपोआप कट होतो. एम-ट्रायंगल एक रहस्य आहे. चमत्कार आहे की, दुसर्‍या जगाचे प्रवेशद्वार आहे? याचे ठोस उत्तर आजपर्यंत कोणाकडेही नाही. परंतु, जे लोक येथे गेले आहेत, त्यांचे असे मत आहे की, ही जागा तुम्हाला पूर्णपणे बदलून टाकते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news