Medieval mysterious tunnel | अश्मयुगीन कबरीखाली मध्ययुगीन ‘रहस्यमयी भुयार’

गुप्त विधींसाठी वापर झाल्याचा कयास
Medieval mysterious tunnel |
Medieval mysterious tunnel | अश्मयुगीन कबरीखाली मध्ययुगीन ‘रहस्यमयी भुयार’
Published on
Updated on

बर्लिन : जर्मनीमध्ये एका अश्मयुगीन दफनभूमीच्या उत्खननादरम्यान पुरातत्त्वशास्त्रज्ञांना मध्ययुगीन काळातील एक गूढ ‘अर्थ टनेल’ सापडले आहे. विशेष म्हणजे, ही कबरी खोदल्याच्या हजारो वर्षांनंतर हे भुयार तयार करण्यात आले असून, याचा वापर कदाचित गुप्त धार्मिक विधी पार पाडण्यासाठी केला असावा, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

2025 च्या अखेरीस, सॅक्सनी-अनहाल्ट येथील राज्य वारसा व्यवस्थापन आणि पुरातत्त्व कार्यालयाने डॉर्नबर्ग गावाजवळ एका बांधकाम प्रकल्पापूर्वी जमिनीचे सर्वेक्षण सुरू केले होते. या दरम्यान शास्त्रज्ञांना पुढील गोष्टी आढळल्या : इसवी सन पूर्व चौथ्या सहस्रकातील एक त्रिकोणी चर, इसवी सन पूर्व तिसर्‍या सहस्रकातील ‘नियोलिथिक’ (नवाश्मयुगीन) काळातील अनेक कबरी व इसवी सन पूर्व दुसर्‍या सहस्रकातील कांस्ययुगीन दफन ढिगारा. उत्खननादरम्यान शास्त्रज्ञांना 6.5 फूट लांब आणि 2.5 फूट रुंद असलेला एक अंडाकृती खड्डा आणि त्यावर एक मोठा दगड आढळला. सुरुवातीला ही दुसरी एखादी कबर असावी असे वाटले; पण खोदकाम केल्यावर त्याचे रूपांतर एका भुयारी प्रणालीत झाले. जर्मन भाषेत याला ‘एर्डस्टॉल’ असे म्हणतात, ज्याचा अर्थ ‘जमिनीतील भुयार’ असा होतो.

हे भुयार अशा प्रदेशात आढळतात जिथे माती घट्ट पण खोदण्यास सोपी असते. जर्मनीच्या बाव्हेरिया भागात अशी शेकडो भुयारे सापडली आहेत, जी बहुधा मध्ययुगात बांधली गेली असावीत. पुरातत्त्वशास्त्रज्ञांच्या मते, या भुयारांमध्ये लोक राहत नसावेत. मग यांचा वापर कशासाठी केला जायचा? तज्ज्ञांमध्ये याबद्दल मतभेद आहेत. काहींच्या मते हे लपण्याचे ठिकाण होते, तर काहींच्या मते येथे गुप्त धार्मिक किंवा तांत्रिक विधी केले जात असत. बहुतेक अशा भुयारांमध्ये काहीही वस्तू सापडत नाहीत. मात्र, डॉर्नबर्ग येथील या भुयारात महत्त्वपूर्ण पुरावे मिळाले आहेत : घोड्याची लोखंडी नाल, कोल्ह्याचा सांगाडा, गोलाकार मातीच्या भांड्याचे तुकडे व कोळशाचा थर. शास्त्रज्ञांच्या मते, या भुयाराचे प्रवेशद्वार जाणीवपूर्वक मोठ्या दगडांनी बंद करण्यात आले होते. हे कदाचित भुयारातील ‘गुप्त हालचाली’ जगापासून लपवण्यासाठी केले असावे, असा त्यांचा प्राथमिक अंदाज आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news