

नवी दिल्ली : एका संशोधनात असं दिसून आलंय की, जे लोक दिवसातून दोनदा ब्लॅक टी पितात, त्यांचा अकाली मृत्यूचा धोका 9 ते 13 टक्क्यांनी कमी होते. काळ्या चहामुळे हार्ट अॅटॅकचा धोका कमी होतो. ब्लॅक टी हृदयासाठी लाभदायक आहे. कारण, त्यात अँटिऑक्सिडेंटस् असतात. इतर चहाच्या तुलनेत ब्लॅक टीची पत्ती पूर्णपणे ऑक्सिडाईज असते. त्यात ज्या पद्धतीने अँटिऑक्सिडेंटस् बनतात, ते नष्ट होत नाही. यात फ्लेवेनोएड आणि थीएफ्लाविन्स कपाऊंड अधिक असतात, ज्यामुळे शरीरात क्रोनिक आजार होत नाही. स्थूलता, मधुमेह, हृदयविकार, यकृताचे आजार दूर ठेवण्यासाठी हे गुणकारी आहे.
ब्लॅक टी हे अँटी इंफ्लेमेटरी आहे, त्यामुळे अनेक आजारांपासून संरक्षण होतं. ब्लॅक टी उच्च रक्तदाब कमी करण्यास मदत करते. त्यामुळे हृदयाशी संबंधित आजारांचा धोका कमी होतो. ते शरीरात इन्फ्लामेशन कमी करण्याचं काम करतात. त्यामुळे ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस कमी होतो. त्यामुळे कर्करोग, मधुमेह, स्ट्रोकचा धोका कमी होतो. ब्लॅक टी शरीरासाठी अमृत आहे. पण, ती खास पद्धतीने तयार केली तरच फायदा होतो. तुम्ही ब्लॅक टीमध्ये दूध आणि साखर टाकली, तर त्याचा फायदा होणार नाही. भारतात लोक विना दूध आणि साखरेशिवाय चहा पितच नाही. साखर ब्लॅक टीमधील अँटिऑक्सिडेंटसोबत प्रतिक्रिया करायला सुरुवात करेल. त्यामुळे त्याचा फायदा होणार नाही. साखरेऐवजी तुम्ही त्यात मोंक फ्रूट वगैरेसारखे अन्य काही गोड पदार्थ टाकू शकता. यासोबतच ब्लॅक टीमध्ये चहाच्या पानांचा वापर करा. जर हे प्रोसेस्ड केलेले पानं असतील, तर त्याचा फार कमी फायदा होईल. ब्लॅक टीला पाण्यात तीन ते पाच मिनिटं उकळून घ्या. ब्लॅक टीमध्ये लिंबू, आले किंवा दालचिनी टाकली, तर त्याचा अधिकच फायदा होईल.