NASA Mars mission: ‘एमआरओ‌’ने मंगळाच्या 1 लाख छायाचित्रांचा गाठला ऐतिहासिक टप्पा!

मार्च 2006 पासून मंगळाच्या अवकाशात घिरट्या घालणाऱ्या या यानाने आपल्या ‌ ‘HiRISE’ कॅमेऱ्याच्या मदतीने हा पल्ला गाठला
NASA Mars mission
NASA Mars mission: ‘एमआरओ‌’ने मंगळाच्या 1 लाख छायाचित्रांचा गाठला ऐतिहासिक टप्पा!Pudhari
Published on
Updated on

वॉशिंग्टन : अंतराळ संशोधनात महत्त्वाची भूमिका बजावणारे ‌‘नासा‌’चे ‌‘मार्स रिकॉनिसन्स ऑर्बिटर‌’ (MRO) हे अवकाशयान लवकरच मंगळाच्या कक्षेतील आपल्या प्रवासाची 20 वर्षे पूर्ण करणार आहे. या ऐतिहासिक प्रवासात या यानाने एक मोठा टप्पा गाठला असून, मंगळाच्या पृष्ठभागाचे तब्बल 1,00,000 वे (एक लाखवे) छायाचित्र टिपले आहे.

मार्च 2006 पासून मंगळाच्या अवकाशात घिरट्या घालणाऱ्या या यानाने आपल्या ‌ ‘HiRISE’ कॅमेऱ्याच्या मदतीने हा पल्ला गाठला आहे. आकडेवारीनुसार, ‌‘एमआरओ‌’ने दरवर्षी सरासरी 5,000, दरमहा 417 आणि गेल्या 20 वर्षांपासून दररोज सुमारे 14 छायाचित्रे पृथ्वीवर पाठवली आहेत. एखाद्या विशीतल्या तरुणाचा फोन जसा फोटोंनी भरलेला असतो, तशीच काहीशी स्थिती या यानाची झाली आहे, असे कौतुक ‌‘नासा‌’ने केले आहे. 7 ऑक्टोबर रोजी टिपलेले हे मैलाचा दगड ठरणारे छायाचित्र ‌‘सिर्टिस मेजर‌’ या भागाचे आहे. हा भाग डोंगर, विवरे आणि वाळूच्या ढिगाऱ्यांनी व्यापलेला आहे. विशेष म्हणजे, हा भाग ‌‘जेझेरो क्रेटर‌’च्या अगदी जवळ आहे, जिथे नासाची ‌‘पर्सिव्हरन्स रोव्हर‌’ सध्या जीवसृष्टीचे पुरावे शोधत आहे. याआधीही ‌‘एमआरओ‌’ने या भागातील वाळूचे ढिगारे वाऱ्यामुळे आपली जागा हळूहळू बदलत असल्याचे पुरावे दिले होते. ‌

‘नासा‌’च्या ‌‘जेट प्रोपल्शन लॅबोरेटरी‌’मधील शास्त्रज्ञ लेस्ली टॅम्परी यांनी सांगितले की, ‌‘HiRISE कॅमेऱ्याने केवळ मंगळाचे दर्शनच घडवले नाही, तर काळाप्रमाणे तिथे होणारे बदलही दाखवून दिले आहेत. वाऱ्यासोबत सरकणारे वाळूचे ढिगारे आणि उतारावरून कोसळणाऱ्या दरडी आम्ही पाहिल्या आहेत.‌’ मंगळावर कधी पृथ्वीसारखे पाण्याचे सामाज्य होते का, हे शोधण्यासाठी या बदलांचा अभ्यास अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. 12 ऑगस्ट 2005 रोजी फ्लोरिडा येथून प्रक्षेपित झालेले हे यान जोपर्यंत शक्य आहे तोपर्यंत मंगळाचे चित्रीकरण सुरूच ठेवणार आहे. ऑक्टोबरमध्ये या यानाने मंगळाचा अभ्यास थांबवून अंतराळातील ‌‘3 ख/ ATLAS’ या आंतरतारकीय धूमकेतूचेही छायाचित्र टिपले होते. हा धूमकेतू त्यावेळी पृथ्वीपेक्षा या अवकाशयानाच्या अधिक जवळ होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news