Pancreatic cancer treatment | ‘एम-आरएनए’ लसीमुळे स्वादुपिंडाच्या कर्करोगावर मात

अनेक रुग्ण 6 वर्षे राहिले जिवंत
Pancreatic cancer treatment |
Pancreatic cancer treatment | ‘एम-आरएनए’ लसीमुळे स्वादुपिंडाच्या कर्करोगावर मातMattL_Images
Published on
Updated on

न्यूयॉर्क : स्वादुपिंडाचा कर्करोग हा सर्वात धोकादायक कर्करोगांपैकी एक मानला जातो, ज्यामध्ये रुग्णाच्या वाचण्याची शक्यता अत्यंत कमी असते. मात्र, आता एका नवीन संशोधनाने आशेचा किरण दाखवला आहे. ‘मेमोरियल स्लोन केटरिंग कॅन्सर सेंटर’च्या शास्त्रज्ञांनी एक पर्सनलाईज्ड mRNA (एम-आरएनए) लस तयार केली आहे, जिच्या मदतीने अनेक रुग्ण 6 वर्षांहून अधिक काळ जिवंत राहिले आहेत. या आजाराच्या उपचारातील हा एक ऐतिहासिक टप्पा मानला जात आहे.

72 वर्षीय डोना गुस्टाफसन यांना अचानक कावीळ झाली, त्यानंतर तपासणीत त्यांना दुसर्‍या स्टेजचा स्वादुपिंडाचा कर्करोग असल्याचे निदान झाले. शस्त्रक्रियेनंतर त्यांनी या नवीन लसीच्या चाचणीत सहभाग घेतला. आज अनेक वर्षांनंतरही त्या कर्करोगमुक्त आहेत. योग्य वेळी उपचार आणि नवीन तंत्रज्ञानाचा वापर किती प्रभावी ठरू शकतो, याचे हे उत्तम उदाहरण आहे. स्वादुपिंडाच्या कर्करोगाचे लवकर निदान होत नाही, हे यामागचे मुख्य कारण आहे. याची लक्षणे खूप उशिरा दिसतात. केवळ 20 टक्के रुग्णांमध्येच शस्त्रक्रिया करणे शक्य होते. याच कारणामुळे याचा 5 वर्षांचा सर्व्हायव्हल रेट 13 टक्क्यांपेक्षाही कमी आहे.

ही लस ‘इम्युनोथेरपी’वर आधारित आहे. म्हणजेच ती शरीराची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करून कर्करोगाशी लढण्यास मदत करते. याची प्रक्रिया अशी : 1. शस्त्रक्रियेदरम्यान ट्यूमरचा नमुना घेतला जातो. 2. शास्त्रज्ञ त्यातील जनुकीय बदल (Mutation) ओळखतात. 3. त्यानुसार त्या विशिष्ट रुग्णासाठी खास mRNA लस तयार केली जाते. 4. ही लस शरीरातील पेशींना कॅन्सर सेल्स कसे ओळखून नष्ट करायचे, याचे प्रशिक्षण देते. ‘नेचर’ या नियतकालिकात प्रसिद्ध झालेल्या अभ्यासानुसार सुमारे 50 टक्के रुग्णांमध्ये मजबूत ‘इम्युन रिस्पॉन्स’ दिसून आला.

ज्या रुग्णांच्या शरीराने प्रतिसाद दिला, त्यापैकी जवळजवळ 90 टक्के रुग्ण दीर्घकाळ जिवंत राहिले. या लसीमुळे शरीरातील ‘किलर T- Cells’ आणि ‘हेल्पर T- Cells’ सक्रिय होतात. यापूर्वी कर्करोगावरील लसी प्रगत स्टेजमध्ये फारशा प्रभावी नव्हत्या. मात्र, या संशोधनानुसार, शस्त्रक्रियेनंतर सुरुवातीच्या काळात ही लस दिल्यास मोठा फायदा होऊ शकतो. हे पाहता, बायोएनटेक आणि जेनेन्टेकसारख्या कंपन्या आता मोठ्या प्रमाणावर (Phase 2) चाचण्या करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news