Most translated word | सर्वाधिक ‘ट्रान्सलेट’ झालेला शब्द कोणता?

Most translated word |
Most translated word | सर्वाधिक ‘ट्रान्सलेट’ झालेला शब्द कोणता?
Published on
Updated on

न्यूयॉर्क : ‘गुगल ट्रान्सलेट’ सेवेला आता 20 वर्षे पूर्ण झाली आहेत. या विशेष प्रसंगी ‘गुगल इंडिया’ने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात जगात गेल्या दोन दशकांत सर्वाधिक वेळा अनुवादीत झालेला शब्द ‘Thank You’ म्हणजे ‘धन्यवाद’ हा आहे. हे मनाला पटणारं नाही. कारण, हा शब्द साधारण आहे; पण जगात हाच शब्द सर्वाधिक वेळा अनुवादीत करण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे.

समाजात एकमेकांना आदर दाखवण्यासाठी या शब्दाचा वापर करण्यात येतो. ‘गुगल’ने याविषयीचे एक छोटे व्हिज्युअल शेअर केले आहे. त्यात हा शब्द विविध भाषांमध्ये दाखवण्यात आला आहे. ‘Thank You’ केवळ दोन शब्दांचे एक साधारण वाक्य आहे; पण त्याचे महत्त्व जगातील जवळपास सर्वच भाषा आणि संस्कृतीत दिसते. लोक हा शब्द सन्मान, आदर, आभार आणि एकमेकांशी चांगला व्यवहार करण्यासाठी वापरतात. त्यामुळेच हा शब्द Google Translate मध्ये सर्वाधिक वेळा अनुवादीत करण्यात आला आहे.

सोशल मीडियावर गुगल ट्रान्सलेटच्या या पोस्टला यूझर्सने भरभरून प्रेम दिले आहे. अनेकांनी कमेंट केल्या आहेत. त्यात त्यांनी ‘Thank You’ या शब्दाला त्यांच्या मातृभाषेत काय म्हणतात, हे कमेंटमध्ये सांगितले आहे. Google Translate ची सुरुवात वर्ष 2006 मध्ये झाली होती. सुरुवातीला ही सेवा जगातील अगदी मोजक्या भाषेसाठीच होती; पण हळूहळू या सेवेचा विस्तार करण्यात आला. हा जगातील सर्वात आवडता ट्रान्सलेशन टुल्स झाला. आज वेबसाईट, Android आणि iOS प्लेटफॉर्मवर गुगल ट्रान्सलेट सेवा उपलब्ध आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news