‘हे’ आहे जगातील सर्वात महागडे लाकूड

झाड मुख्यतः दक्षिण आफ्रिकेच्या कोरड्या भागांमध्ये आढळते
most expensive wood in the world
‘हे’ आहे जगातील सर्वात महागडे लाकूडPudhari File Photo
Published on
Updated on

लंडनः दाक्षिणात्य स्टार अल्लू अर्जुनचा चित्रपट ‘पुष्पा’ मध्ये लाल लाकूड म्हणजेच रक्तचंदनाची तस्करी दाखवली आहे. ज्यानंतर सगळ्यांनाच वाटू लागले की जगातील सगळ्यात महागडे लाकूड म्हणजेच रक्तचंदन आहे.‘पुष्पा’ चित्रपटात दाखवलेल्या रक्तचंदनापेक्षा आफ्रिकन ब्लॅकवूड हे लाकूड अधिक दुर्मीळ आणि महाग आहे. हे झाड मुख्यतः दक्षिण आफ्रिकेच्या कोरड्या भागांमध्ये आढळते.

या झाडाचा पूर्ण विकास होण्यासाठी 60 ते 100 वर्षे लागतात आणि हे झाड 25 ते 40 फूट उंच वाढतं. हे लाकूड गडद तपकिरी किंवा शिसवासारखे काळसर, भरीव, मजबूत आणि टिकाऊ आहे. विशेष म्हणजे, हे लाकूड कधीच सडत नाही आणि याला किडेही लागत नाहीत. आफ्रिकन ब्लॅकवूडचा उपयोग सनई, बासरी, गिटार, व्हायोलिन यांसारख्या महागड्या संगीत वाद्यांच्या निर्मितीसाठी केला जातो. हाय-एंड फर्निचर आणि कलाकृती तयार करण्यासाठीही हे लाकूड मोठ्या प्रमाणावर वापरले जाते. त्यामुळे श्रीमंत वर्गात या लाकडाला खूप मागणी आहे. आफ्रिकन ब्लॅकवूडला जगातील सर्वात महाग लाकूड मानलं जातं. एक किलो लाकडाची किंमत तब्बल 7 लाख रुपयांपासून सुरू होते, ज्यात एका लक्झरी कारची किंमत बसते. या लाकडाच्या प्रचंड मागणीमुळे झाडांची संख्या झपाट्याने घटत आहे. त्यामुळे आफ्रिकन ब्लॅकवूड नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. काही देशांनी लाकडाच्या कापणीवर मर्यादा आणल्या आहेत तसेच या झाडांचं संवर्धन करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, जे त्याच्या टिकावासाठी अत्यावश्यक आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news