

स्टॉकहोम : वेळ ही सर्वात मौल्यवान गोष्ट आहे, कारण ती एकदा निघून गेली की ती कोणत्याही किमतीत परत आणता येत नाही, म्हणूनच त्याला ‘अमूल्य’ म्हणतात. मात्र, तरीही आपण घड्याळे महागडी वापरतो. आलिशान कार आणि आलिशान घरांप्रमाणेच काही घड्याळांच्या किमतीही इतक्या जास्त असतात की, त्या पाहिल्यानंतर प्रश्न पडेल की घड्याळही इतके महाग असू शकते का? या घड्याळाचे नाव आहे ‘ग्राफ डायमंडस हॅल्युसिनेशन वॉच’! या घड्याळाची किंमत देखील नक्कीच आश्चर्यचकित करणारी आहे. याची किंमत 55 दशलक्ष (सुमारे 466 कोटी रुपये) आहे आणि हे आतापर्यंत विकले गेलेले सर्वात महागडे घड्याळ आहे. या घड्याळाचे ठळक वैशिष्ट्य म्हणजे यात गुलाबी, निळा, हिरवा, नारिंगी आणि पिवळा या रंगांमध्ये जगातील दुर्मीळ आणि सर्वोत्तम दर्जाचे 110 कॅरेटचे हिरे बसवण्यात आले आहेत.
‘द हॅल्युसिनेशन’ हा एक उत्कृष्ट नमुना आहे आणि कला, दागिने आणि लक्झरीला पुन्हा परिभाषित करणारी हट कॉऊचर यांचे परिपूर्ण मिश्रण देखील आहे. हे दुर्मीळ, फॅन्सी रंगाचे हिरे त्यांच्या अपवादात्मक दुर्मीळतेमुळे आणि मूल्यामुळे अत्यंत मूल्यवान आहेत. बहुतेक डायमंड घड्याळे गोल किंवा बॅगेट कट हिर्यांनी जडलेली असतात. पण यामध्ये हार्ट, नाशपाती, पन्ना, मार्कीज आणि राऊंड कटस् यांचे मिश्रण निवडण्यात आले आहे. हिर्यांची रचना आणि त्यांचे रंग या घड्याळाच्या लक्झरीत भर घालतात. हे घड्याळ बनवण्यासाठी सोने किंवा चांदी नव्हे, तर प्लॅटिनम धातूचा वापर करण्यात आला आहे.